सामाजिक

अवसरी बुद्रुक येथे “कला अविष्कार चित्र व शिल्प प्रदर्शनाचे आयोजन” : प्रदर्शनाला नागरिकांकडून प्रचंड प्रतिसाद….

Published

on

मंचर दि (प्रतिनिधी) अवसरी बुद्रुक  येथील विद्या विकास मंदिर माध्य व उच्च माध्य विद्यालय या विद्यालयातील कलाशिक्षक श्री. संतोष चव्हाण सर यांच्या संकल्पनेतून कलाविष्कार चित्र आणि शिल्प  प्रदर्शनाचे आयोजन आले होते .प्रदर्शनास  नागरिकांणाकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला 

 उत्तर पुणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागात प्रथमच  प्रथमच दि.25 जाने ते 27 जाने. या काळात तालुक्यातील विद्यार्थ्यांच्या कला गुणांना वाव मिळण्यासाठी ” कलाशिक्षक आणि विद्यार्थी यांच्या कलाकृतीचे कलाविष्कार चित्र आणि शिल्प प्रदर्शनाचे आयोजन आले होते .या प्रदर्शनाचे उदघाटन साई चित्रकला महाविद्यालयाचे प्राचार्य मा.श्री.दत्ता ठुबे सर यांचे शुभहस्ते करण्यात आले. संस्थेचे अध्यक्ष श्री.विष्णू काका हिंगे पाटील कार्यकामाच्या अध्यक्ष स्थानी होते. तर प्रदर्शनाच्या उद्घाटन प्रसंगी श्री.भास्कर हांडे सर ( वैश्विक आर्ट गॅलरी नेदरलँड) , सिटीस्केप आर्टीस्ट श्री. गणेश पोखरकर, हे प्रमुख पाहुणे होते. 

 दरम्यान महाराष्ट्र राज्य कलाशिक्षक संघाचे उपाध्यक्ष श्री. किरण सरोदे सर, पुणे जिल्हा कलाशिक्षक संघाचे अध्यक्ष श्री. मिलिंद शेलार सर, आंबेगाव तालुका कलाशिक्षक संघाचे अध्यक्ष श्री. भानुदास बोऱ्हाडे सर, आंबेगाव तालुका मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष श्री. विनोद बोंबले सर , विद्या विकास मंदिर अवसरी बु.विद्यालयाचे माजी मुख्याध्यापक श्री. नानासाहेब पाटील सर आदी मान्यवर उपस्थित होते. या प्रदर्शनात विद्यार्थ्यांनी विविध विषयावर आणि विविध माध्यमातून चित्रे साकारली आहेत.

कलाशिक्षक श्री संतोष चव्हाण सर आणि विद्यालयातील विद्यार्थ्यांनी तसेच आंबेगाव तालुक्यातील काही कलाशिक्षक व विद्यार्थ्यांनी विविध विषयांवर आणि विविध माध्यमातून साकारलेल्या 250 चित्र व शिल्प कलाकृतींचा कलाविष्कार प्रदर्शनाच्या माध्यमातून मांडण्यात आला आहे.  व यात प्रामुख्याने निसर्ग चित्रे,व्यक्ती चित्रे, वस्तू चित्रे याबरोबरच सामाजिक विषयांवरील चित्रे तसेच अमूर्त व आधुनिक शैलीची चित्रे जलरंग, पोस्टर रंग, ॲक्रॅलिक, ऑईल पेस्टल, क्रेऑन यां सोबतच तैलचित्र देखील साकारली आहेत. त्याचप्रमाणे विद्यालयाचे माजी विद्यार्थी श्री. आदेश शहा यांची 50 काष्ठ शिल्प या प्रदर्शनात मांडण्यात आली होती. 

कोरोना नंतर शाळा रेग्युलर सुरू झाल्या परंतु मुलांमध्ये शिक्षणाच्या बाबतीत पठारावस्था आलेली आहे. मुलांना यातुन बाहेर काढून शैक्षणिक वातावरण निर्माण करण्यासाठी मुलांना रंगांच्या सानिध्यात आणून त्यांच्यात उत्साह निर्माण करण्याच्या हेतूने या प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले असून विद्यालयाने ग्रामीण भागात अशा प्रकारचा अतिशय स्तुत्य आणि यशस्वी उपक्रम राबविला आहे. 

यासाठी संस्थेचे अध्यक्ष, श्री. विष्णू काका हिंगे, उपाध्यक्ष – श्री. योगेश शेठ चव्हाण, उपसचिव श्री. दिपकशेठ चवरे, संचालक- श्री. अजित वाडेकर, शिवशंभो प्रतिष्ठान अवसरी बु. यांचे विशेष सौजन्य लाभले.आणि ग्रामपंचायत अवसरी बु यांचे विशेष सहकार्य लाभले.  या प्रसंगी श्री.सचिन वाघ साहेब, मंचर पोलीस स्टेशन चे श्री. डावखर साहेब आणि शिंदे साहेब, पुणे जिल्हा कलाध्यापक संघाचे संस्थापक अध्यक्ष श्री. श्रावण जाधव सर, भाजप चे जिल्हाध्यक्ष जनसेवक श्री.संजयभाऊ थोरात साहेब, आंबेगाव तालुका कांग्रेस कमेटी चे अध्यक्ष राजु इनामदार, मयूर मंडळाचे संस्थापक अध्यक्ष श्री. हरिदास रामवत सर, पुणे जिल्हा उपप्रमुख श्री. अजितराव चव्हाण, शिवाजीराव आढळराव पाटील विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री. राजु आढळराव सर, आदी मान्यवरांनी त्याचप्रमाणे विद्यालयाचे माजी मुख्याध्यापक व शिक्षक, ग्रामस्थ, पालक , माजी विद्यार्थी यांनी सदिच्छा भेटी देवून विद्यालयाने राबविलेल्या या स्तुत्य उपक्रमाचे कौतुक केले.

त्याचप्रमाणे शिंगवे, पारगाव, निरगुडसर, लांडेवाडी , घोडेगाव या शाळांचे कलाशिक्षक व विद्यार्थ्यांनी भेटी दिल्या.या संपूर्ण कार्यक्रमाचे नियोजन विद्यालयाचे शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Trending

Exit mobile version