सामाजिक
चांडोली बुद्रुक येथे प्रजासत्ताक दिनानिमित्त भव्य रक्तदान शिबिर व रुग्णवाहिका लोकार्पण सोहळा संपन्न
मंचर दि (सदानंद शेवाळे)-साऊली फाउंडेशन या संस्थेच्या माध्यमातून चांडोली बुद्रुक येथे आयोजित केलेल्या रक्त दान शिबिरात अनेक नागरिकांनी स्वच्छेने रक्तदान करीत समाजाप्रती आपली राष्ट्रनिष्ठा निष्ठा व्यक्त केली
“रक्त दान हेच खरे श्रेष्ठ दान”… आज रोजच्या धावपळीच्या जीवनात नागरिकांना अनेक शारीरिक समस्याना तोंड देताना रक्ताची गरज पडते अशा वेळी वेळेत रक्त उपलब्ध झाले तर अनेक गरजवंतांचे प्राण वाचू शकतात या सामाजिक भावनेतून आंबेगाव तालुक्यातील सावली फाउंडेशन या संस्थेने शहीद जवान प्रसादभाऊ थोरात व सुधीर भाऊ थोरात यांच्या प्रेरनेतून चांडोली बुद्रुक ता. आंबेगाव या ठिकाणी भव्य रक्तदान शिबिर व रुग्णवाहिका लोकार्पण सोहळा कार्यक्रम संपन्न झाला.
२६ जानेवारी २०२५ रोजी भारतीय प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधत ग्रामपंचायत चांडोली बुद्रुक या ठिकाणी पार पडलेल्या या कार्यक्रमात प्रथम शहीद जवान सुधीरभाऊ व प्रसाद भाऊ यांच्या कुटुंबीयांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज, धर्मवीर संभाजी महाराज व शहीद जवानांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. त्यानंतर रुग्णवाहिकेचे लोकार्पण महेश भाऊ वाघ यांच्या शुभहस्ते करण्यात आले. यावेळी पार पडलेल्या रक्तदान शिबिरात रक्तदात्यांनी रक्तदान केले.
दरम्यान रक्तदान केलेल्या प्रत्येक रक्तदात्यास भेटवस्तू स्वरूपात जर्किग व एक झाड देण्यात आले तसेच रक्तदान केलेल्या रक्तदात्यास कधीही रक्ताची गरज भासल्यास सावली फाउंडेशन च्या माध्यमातून एक रक्त पिशवी दिली जाणार आहे. यावेळी शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना, व रक्तदात्याना सावली फाउंडेशनच्या माध्यमातून जेवण देण्यात आले या कार्यक्रमाला ग्रामपंचायत चांडोली बुद्रुक सर्व पदाधिकारी, प्राथमिक शाळा, माध्यमिक शाळेचे विद्यार्थी, शिक्षक, पालक व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.