सामाजिक
ग्रामीण भागातील महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करणासाठी प्रयत्न करणार – पूजन शाह
मंचर दि (प्रतिनिधी ) ग्रामीण भागातील महिलांना सक्षमीकरण करण्यासाठी नजीकच्या काळात कंपनीच्या माध्यमातून विविध ठिकाणी “यशोदा महिला दूध संकलन केंद्र ” सुरु करणार असल्याची माहिती गोवर्धन दूध प्रकल्पाचे संचालक पुजन शाह यांनी दिली.
शिरूर तालुक्यातील पाबळ येथे पराग मिल्क फूड्स संचालित अत्याधुनिक यंत्रनेच्या श्रीनाथ डेअरी दूध संकलन केंद्राचे उदघाटण शाह यांचे हस्ते करण्यात आले यावेळी दूध संकलन अधिकारी उन्मेष क्षीरसागर, आदिनाथ नरवडे, लोणी चे सरपंच राजेंद्र सिनलकर आदी मान्यवर उपास्थित होते यावेळी बोलताना पुजण शाह पुढे म्हणाले कि, कुटुंबाला पुढे नेण्यामध्ये घरच्या लक्ष्मीचा मोठा वाटा असतो त्यामुळे महिलाना उत्पनाचे स्तोत निर्माण करून दिले तर आर्थिक उत्पन्न वाढून महिला सक्षम झाली तर ते पूर्ण कुटुंबाची सक्षम होते त्यामुळे पुढील काळात महिलांना आर्थिक दृष्ट्या सक्षम करण्याचे उद्देशाने कंपनीच्या माध्यमातून महिला सक्षक्तिकरणासाठी काम करण्यावर भर देणार असल्याचे पूजन शाह यांनी उदघाटन प्रसंगी सांगितले .
खेड जुन्नर आंबेगाव शिरूर तालुक्यात बल्क कुलरच्या माध्यमातून दुधाची साठवण क्षमता मोठ्या प्रमाणावर वाढविणार असल्याचे सांगितले. आपले मत व्यक्त करताना शाह पुढे म्हणाले कि, पुढील काळात दुधाला चांगला योग्य भाव देऊन दुधाच्या माध्यमातून शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवून शेतकरी आर्थिक दृष्ट्या सक्षम करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे ही त्यांनी सांगतले तसेच शेतकऱ्याची दिवाळी दरवर्षी गोड व्हावी यासाठी दिपावलीमध्ये दुधाला प्रती लिटर पन्नास पैसे बोनस देणार असल्याचे शाह यांनी यावेळी सांगितले त्यांनी सांगितले.