सामाजिक
श्री गणेश जयंती निमित्ताने ” सिद्धिविनायक मंदिरात” प्रसिद्ध उद्योगपती देवेंद्र शाह यांचे हस्ते सापत्नीक विधिवत पूजाविधी संपन्न
मंचर दि. (प्रतिनिधी) चौदा विद्या व चौसष्ठ कलांचा अधीपती, सृष्टीतील सर्व गणांचा अधिनायक श्री गणेशाच्या जयंती निमित्याने मंचर येथील सिद्धिविनायक मंदिरामध्ये श्री गणेश मूर्तीस होम हवन व पूजा विधी प्रसिद्ध उद्योगपती देवेंद्रशेठ शाह यांचे हस्ते सपत्नीक विधिवत संपन्न झाला
.”वक्रतुंड महाकाय सूर्य कोटी समप्रभ| निर्विघ्नं कुरु मे देव, सर्व कार्येषु सर्वदा||” या ब्रम्हांडामध्ये अस्तित्वात असणाऱ्या रज, तमो, व सत्व गुणांच्या सर्व देवता अथवा शक्ती आदी गणांचा अधीपती शिवपार्वती सूत श्री गणेश देवता होत. कोणतेही कार्य करताना श्री गणेश पूजा न होता केलेले कोणतेही कार्य अथवा कर्म हे पूर्णत्वास जात नाही असे शास्त्र सांगते.सर्व गणांचे अधीपती ते गणपती होत.
. मंचर (ता आंबेगाव)येथून जवळच असलेल्या पराग फुड्स (गोवर्धन डेअरी) च्या प्रांगणामध्ये दूध प्रकल्पचे सर्वोसर्वा,चेअरमन देवेंद्रशेठ शाह यांनी आपली अर्धांगिनी सौ प्रीतीबेन शाह यांच्या समवेत ब्राम्हवृंदाच्या उपस्थितीत वेद मंत्राच्या जयघोषात सहकुटुंब सहपरिवार उपस्थित राहून विधिवत पूजा केली यावेळी पराग समूहाचे संचालक पुजन शाह, शब्दाली शाह, अक्षाली शाह गोवर्धन प्रकल्पाचे प्लॅन्ट मॅनेजर संजय मिस्रा,गजानन पाटील, पराग पतसंस्था संचालक विकास भोर सामाजिक कार्यकर्ते निलकंठ काळे, एच आर दिपक शर्मा , आदी मान्यवर उपस्थित होते.गोवर्धन डेअरीच्या प्रांगणात उजविकडे सोंड असलेल्या गणेशदेवतेचे सुंदर नक्षीकाम केलेले सुसज्य मंदिर असून श्री गणेश जयंती निमित्ताने या मंदिरावर विविध मनमोहक फुलांची आरास करण्यात आली आली होती.
उजव्या सोंडेच्या सिद्धिविनायक गणेश मूर्तीची पूजा करताना सोहळ्यात केली जाते असे सांगितले जाते उजवी सोंड असलेली श्री गणेश मूर्तिची विधिवत पूजा केल्यास त्यास फल प्राप्ती लवकर होते.अशी ही मान्यता आहे. परंतु आपली परब्रम्हावरील अतूट श्रद्धा महत्वाचीच असतें. काहींच्या विचार प्रवाहाच्या व्यक्तींच्या मते असेही म्हटले जाते कि, उजव्या सोंडेच्या गणपतींची उजवी बाजू म्हणजे पिंगला (सूर्य नाडी) प्रवाहित असतें. मानवाच्या शरीरात इडा, पिंगला व सुषष्णा स्वर प्रवाहित असतात या स्वरात वाहणाऱ्या नाडीच्या श्वास उश्वासाच्या प्रवाहात कोणती कार्ये करावीत या विषयीची माहिती “शिवस्वरोदय” शास्र सांगते.
दरम्यान गोवर्धन दूध प्रकल्पच्या प्रांगणात बांधण्यात आलेले श्रीसिद्धिविनायक गणेश मंदिर अतिशय सुबक व नक्षीदार कोरीव कामाची उत्कृष्ठ कालाकृती असून आज (दि.१फेब्रुवारी रोजी ) श्री गणेश जयंती निमित्ताने या ठिकाणी विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजना सोबत महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते या प्रसंगी श्री सिद्धिविनायक गणेशांच्या दर्शनासाठी शेकडो भाविकानी सकाळपासूनच गर्दी केली होती.