सामाजिक
सक्षम विद्यार्थी घडवीण्यासाठी अग्रेसर असलेल्या “नालंदा विद्यालयाचा” स्नेह संमेलन सोहळा उत्साहात साजरा..
मंचर दि. (प्रतिनिधी)-सामर्थ्य हि जीवन है | दुर्बलता मृत्यू…. स्वामी विवेकानंदानी म्हटल्याप्रमाणे आजच्या काळात . शिक्षण असेल तर व्यक्ती सामर्थ्यवान आहे अन्यथा दुर्बल… सामाजिक जाणीवेच्या कार्यातून उत्कृष्ट दर्जाचे शिक्षण देत देशाची सक्षम पिढी बनविण्याचे कार्य करताना आपल्या कार्य शैलीतून मंचर परिसरात नावाजलेली इंग्लिश माध्यमाची शाळा म्हणून ओळख असलेल्या नालंदा विद्यालयाचे स्नेहसंमेलन मोठ्या उत्साहाने पार पडले.
जीवनामध्ये प्रत्येक व्यक्ती प्रत्येक क्षणी शिकत असतो शिक्षण घेत असतो.शिक्षण सांस्कृतिक असेल समाजिक असेल शिक्षणात चौदा विद्या चौसाष्ठ कला अंतरभाव असल्याचे सांगितले जाते.शौक्षणिक कार्यात उत्कृष्ठ गुणवत्तेची ओळख निर्माण करणाऱ्या मंचर परिसरात नावाजलेली इंग्लिश माध्यमाची शाळा म्हणून ओळख असलेल्या “नालंदा विद्यालयाचे” स्नेहसंमेलन मोठ्या उत्साहाने पार पडले.
दरम्यान यावर्षी नालंदा विद्यालयाच्या स्थापनेला वीस वर्ष पूर्ण झाली असून यासंबंधित औचित्य साधून “स्नेहसंमेलनाचा नवरस” हा विषय निवडण्यात आला होता. भरतमुनींच्या नाट्यशास्त्रावर आधारित नवरस या विषयावर विद्यार्थ्यांनी विवीध नृत्य सादर करत रसिक प्रेक्षकांचे मनोरंजन केले. यावेळी माजी सहकारमंत्री दिलीपरावजी वळसे पाटील, पूर्वाताई वळसे पाटील, पराग कारखान्याचे चेअरमन यशवर्धन डहाके, शरद बँकेचे संचालक अजय घुले, भीमाशंकर कारखान्याचे चेअरमन बाळासाहेब बेंडे, सुहास बाणखेले, दत्ता थोरात, अरुणाताई थोरात, मनीषा बेंडे, नालंदा इंग्लिश स्कूलच्या प्रिन्सिपल डॉ. करुणा मनुजा, व्हॉईस प्रिन्सिपल सोजी जेकब, शेवाळवाडी सरपंच माधुरी शेटे, एन सी आर टी चे सीईओ अमरजीत खराडे, प्रसिद्ध युट्युबर मंदार पडवळ हे उपस्थित होते.
यावेळी संस्कार फाउंडेशनच्या वतीने विद्यालयातील चार यशस्वी आणि गुणवंत ,क्रीडा आणि शैक्षणिक क्षेत्रात उत्तम कामगिरी बजावलेल्या विद्यार्थ्यांचा सन्मानही करण्यात आला या विद्यार्थ्यांचा सन्मान दिलीप वळसे पाटील आणि पूर्वा ताई वळसे पाटील, अजय घुले, यांच्या हस्ते करण्यात आला माननीय दिलीप वळसे पाटील यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक केले .तसेच शाळेच्या मुख्याध्यापिका डॉक्टर करुणा मनुजा यांचे देखील कौतुक केले. या संपूर्ण कार्यक्रमाचे संयोजन आणि व्यवस्थापन विद्यालयाचे समन्वयक सय्यद मुमताज अली यांनी केले. सूत्रसंचालन निवेदक महेश देशपांडे तसेच विद्या बांगर आणि रफत काझी यांनी केले.