सामाजिक
मंचर उपजिल्हा रुग्णालयात जी. एस. बी. रुग्णांच्या उपचाराकरिता “न्यूरॉलॉजिस्टची ” नेमणूक करून, स्वतंत्र कक्ष सुरु करावा – वसंतराव बाणखेले
मंचर दि. (प्रतिनिधी)- गुइलेन बॅरे सिंड्रोम (G. S. B)आजार च्या उपचाराकरिता मंचर उपजिल्हा रुग्णालायात स्वतंत्र कक्ष स्थापना करावी तसेच रुग्णाच्या उपचाराकारिता त्वरित न्यूरॉलॉजिस्ट ची नेमणूक करण्यात यावी अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते वसंतराव बाणखेले व अँड. अमर कराळे यांनी लेखी निवेदना द्वारे केली आहे.
जी एस बी आजाराचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत असून पुणे शहरात या आजराचे अनेक रुग्ण सापडले आहेत. या आजाराचा वाढता धोका लक्षात घेऊन Gbs ( गुइलेन बॅरे सिंड्रोम ) या दुर्मिळ आजाराचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी मंचर नगरपंचायत ने ठोस व प्रभावी उपाययोजना कराव्यात तसेच नागरिकांमध्ये जनजागृती करण्यासाठी मोहीम हाती घेणे गरजेचे आहे असे बाणखेले व कराळे यांनी सांगितले
दरम्यान जी एस बी या आजाराचे रुग्ण संपूर्ण महाराष्ट्र राज्यात आढळून येत आहेत ज्यामुळे राज्यातील आरोग्य यंत्रणा अलर्ट झाल्या आहेत. या आजाराचा प्रादुर्भाव पुणे शहरात मोठ्याप्रमाणात झाला असून आत्तापर्यंत एकट्या पुण्यातच 165 च्या आसपास रुग्ण मृत्युमुखी पडले असून अनेक रुग्ण व्हेंटिलेटर वरती असून काही रुग्णांवर उपचार चालू आहे. पुणे जिल्ह्यातील ग्रामीण भागात सुदैवाने आजपर्यंत कोणताच रुग्ण आढळला नाही.
परंतु या आजाराचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता मंचर शहरातील नागरिकांच्या आरोग्याच्या सुरक्षिततेबाबत उपाय योजना करणे गरजेचे असून GBS या दुर्मिळ आजाराबाबत नागरिकांमध्ये जनजागृती करवी त्याचप्रमाणे GBS हा आजार प्रामुख्याने खाद्यपदार्था द्वारे होत असल्याने मंचर शहरातील हॉटेल , चिकन तसेच मासे विक्रेते, हातगाडीवर खाद्याचे स्टॉल लावणारे या निगडित व्यवसाय धारकांन स्वछता बाळगण्याबाबत च्या सूचना देऊन त्याची अंमलबजावणी करण्यासाठी कर्मचाऱ्यांचे पथक नेमून अस्वच्छता असणाऱ्या व्यवसायावर कारवाई करण्यात यावी.
दरम्यान मंचर नगरपंचायतीच्या पाणीपुरवठ्याच्या टाक्या व नागरिकांनी साठवलेल्या पाण्याच्या टाक्यांची साफसफाई करणे गरजेचे आहे.त्याचप्रमाणे मंचर च्या ग्रामीण रुग्णालयात GBS च्या उपचारासाठी स्वतंत्र कक्ष स्थापित करून मंचर च्या उपजिल्हा रुग्णालयात न्यूरॉलॉजिस्ट पदाच्या आरोग्य अधिकार्याची ची नेमणूक तात्काळ करण्यात यावी अशी मागणी पाणीपुरवठा समिती चे अध्यक्ष वसंतराव बाणखेले व ॲड. अमर कराळे यांनी लेखी निवेदनाद्वारे केली आहे.