सामाजिक
धामणी येथील “श्री खंडोबा मंदिराच्या तटबंदी जीर्णोद्धारासाठी “ग्रामस्थांकडून ,साडेआठ लाख रुपये.एक तासात जमा
मंचर दि ७ (प्रतिनिधी) ; धामणी (ता. आंबेगाव) येथील पुरातन भैरवनाथ मंदिराच्या तटबंदीच्या जीर्णोद्धाराचे काम सुरू केले असून, त्यासाठी लोकवर्गणीतून २५ लाख रुपये खर्च करण्यात येणार आहेत. ग्रामस्थांच्या पहिल्याच बैठकीत साडेआठ लाख रुपये जमा झाले.
धामणीत सुमारे सव्वाशे वर्षांपूर्वीचे पुरातन भैरवनाथ मंदिर आहे. पाच वर्षांपूर्वी मंदिराच्या शिखरावर वीज पडल्याने काही भाग ढासळला होता. त्यावेळी लोकवर्गणीतून तीन लाख रुपये खर्च करून शिखराचा जीर्णोद्धार करण्यात आला होता असे प्रकाश पाटील जाधव यांनी सांगितले.
गावातील श्री खंडोबा देवस्थान हे जागृत म्हणून ओळखले जातं असून अनेक भाविकांची येथे श्रद्धा आहे सद्या खंडोबा मंदिराच्या दगडी तटबंदीची अनेक ठिकाणी पडझड झाली आहे. या मंदिराच्या तटबंदीच्या एका दगडावर बांधकाम केल्याचे वर्ष शके १८२६ कोरले असून त्याकाळी एकूण खर्च पाच हजार रुपये आल्याचा उल्लेख दुसऱ्या एका पाषाणावर असल्याचे सागर जाधव यांनी सांगितले.
दरम्यान मंदिराच्या तटबंदीच्या जीर्णोद्धाराचे काम हाती घेण्याचा निर्णय धामणी ग्रामस्थांनी घेतला. यासाठी २६ जानेवारी रोजी ग्रामस्थांनी बैठक घेऊन तटबंदीच्या कामासाठी २५ लाख रुपये जमा करण्याचा निर्णय घेतला. यावेळी बैठकीत उपास्थित भाविकानी आपली रक्कम जाहीर केली यात साडे आठ लाख रुपाये निधी अवघ्या एक तासातच जमा झाला
यावेळी माजी पंचायत समिती सदस्य रवींद्र करंजखेले, गजाराम पाटील जाधव, उद्योजक ज्ञानेश्वर विधाटे, विलास पगारिया, शांताराम जाधव, विठ्ठल जाधव, सरपंच रेश्मा बोन्हऱ्हाडे, उपसरपंच अक्षय विधाटे, माजी सरपंच सागर जाधव, शांताराम रोडे, कैलास रोडे, सूर्यकांत रोडे उपस्थित होते.