सामाजिक
“हर घर नल, हर घर जल” अंतर्गत प्रत्येक नागरिकास ५५लिटर पाणी मिळावे हा शासनाचा उद्देश – कुंडलिक कोहिणकर
मंचर दि ७ (प्रतिनिधी) ;संपूर्ण भारतभर जल जिवन योजनेअंतर्गत ‘हर घर नलसे जल’ ही योजना राबवली जातं असून कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीस पंचावंन्न लिटर पाणी मिळावे हा उद्देश असल्याचे प्रतिपादन यशदा संस्थेचे राज्यस्तरीय प्रशिक्षक कुंडलिक कोहीनकर यांनी केले
पारगाव (ता. आंबेगाव) याठिकाणी जिल्हा परिषद पुणे, पंचायत समिती आंबेगाव, साईप्रेम ग्रामीण विकास संस्था यांच्या माध्यमातून जलजीवन मिशन योजनेअंतर्गत टप्पा क्रमांक तीनचे प्रशिक्षण शिबिरात २० ग्रामपंचायतीच्या पदाधिकाऱ्यांचा सहभाग घेतला. या प्रशिक्षण शिबिरात यशदा संस्थेचे राज्यस्तरीय प्रशिक्षक कोहीनकर व ममता देशपांडे यांनी जलजीवन मिशन योजनेअंतर्गत उभ्या राहिलेल्या योजनेचे हस्तांतरण, देखभाल, दुरुस्ती याविषयी सविस्तर मार्गदर्शन केले.
यावेळी पारगावच्या सरपंच श्वेता ढोबळे, मेंगडेवाडीचे सरपंच बाळासाहेब मेंगडे, काठापूरचे सरपंच अशोक करंडे, वाळुंज नगरच्या सरपंच तृप्ती वाळुंज भागडीच्या उपसरपंच लता ठंडे, पारगावचे उपसरपंच नितीन ढोबळे, वीरेंद्र ढोबळे, विशाल करंडे उपस्थित होते. कुंडलिक कोहीनकर म्हणाले, “जलजीवन मिशन योजनेअंतर्गत प्रत्येक गावांतील प्रत्येक कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीस ५५ लिटर याप्रमाणे शुद्ध पिण्याचे पाणी मिळावे, हे मुख्य उद्दिष्ट असून योजना सुरुवातीपासून तर शेवटपर्यंत यशस्वी करण्यासाठी ग्रामपंचायत व ग्रामस्थांनी योग्य ती काळजी घेतली पाहिजे. संपूर्ण भारतभर जल जिवन योजनेअंतर्गत ‘हर घर नलसे जल’ ही योजना राबवली जात आहे