सामाजिक
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसानिमित् विविध सामाजिक कार्यक्रमाचे आयोजन
मंचर दि. (प्रतिनिधी )- महाराष्ट्राचे लोकप्रिय उपमुख्यमंत्री मा.ना.एकनाथजी शिंदे साहेब यांचा वाढदिवस संपूर्ण महाराष्ट्रात “एकनाथ हिरक ६० आरोग्यवर्ष” म्हणून साजरा करण्यात येत आहे.यानिमित्त विविध सामाजिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती शिवसेना युवासेना कार्यकरणी सदस्य सचिन बांगर यांनी दिली.
शिवसेनेच्या वतीने आयोजित कार्यक्रमांतर्गत ज्युपिटर हॉस्पिटल ठाणे येथे महाराष्ट्रातील लहान मुलांच्या मोफत हृदय शस्त्रक्रिया, दिव्यांग बांधवांना मोफत साहित्य वाटप, भव्य महाआरोग्य शिबिरांचे आयोजन, नागरिकांना मोफत चष्मे वाटप, मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया, ६० हजार किलोमीटरची आरोग्य संवाद यात्रा, ६० हजार वृक्ष लागवड आदी उपक्रम राबविण्यात येत आहेत.
त्याचप्रमाणे आंबेगाव तालुक्यात देखील महिनाभर विविध सामाजिक उपक्रम राबविण्यात येणार असून रविवार, दिनांक ९ फेब्रुवारी २०२५ रोजी सकाळी १०.३० वाजता आंबेगाव तालुका शिवसेनेच्या वतीने मंचर येथील उपजिल्हा रुग्णालयात रुग्णांना फळवाटप करण्यात आले.
यावेळी युवासेना कार्यकारिणी सदस्य सचिन बांगर, शिवसेना जिल्हा परिषद गटनेते देविदास दरेकर, शिवसेना उपजिल्हाप्रमुख अजित चव्हाण, शिवसेना तालुकाप्रमुख प्रविण थोरात पाटील, भैरवनाथ पतसंस्थेचे संचालक सागर काजळे, युवासेना तालुकाप्रमुख वैभव पोखरकर, शिवसेना शहरप्रमुख संदीप जुन्नरे, मंचरचे मा.उपसरपंच धनेश मोरडे, युवानेते धनेश बाणखेले, उद्योजक संदीप एरंडे, मा.शहरप्रमुख रामदास जाधव, शिवसेना उपतालुकाप्रमुख किरण ढोबळे, स्वप्निल हिंगे, शिंगवे शाखाप्रमुख प्रविण गोरडे, निलेश बांगर, सोमनाथ भेके, यांच्यासह आंबेगाव तालुक्यातील शिवसेना पदाधिकारी व शिवसैनिक होते.