सामाजिक
घोडेगाव वकील संघटनेच्या वतीने, लांडेवाडी येथे “वकील संघटनामध्ये तालुकास्तरीय क्रिकेट स्पर्धेचे आयोजन”.
मंचर दि ११ (प्रतिनिधी) ; घोडेगाव वकील संघटनेच्या वतीने वकिलांना सध्याच्या घाई गर्दीच्या काळात विरंगुळा मिळावा यासाठी खेड, आंबेगाव व जुन्नर वकील बार असोसिएशन मध्ये मैत्रीपूर्ण क्रिकेट स्पर्धांचे आयोजन रविवार दि १० रोजी लांडेवाडी (ता. आंबेगाव) येथे करण्यात आले
सद्याच्या काळात सर्व काही सहज शक्य आहे परंतु मनाला आनंद समाधान मिळणे मात्र दुरास्पद होत आहे या धकाधकीच्या जीवनात व मोबाईल च्या विळख्यात प्रत्येक व्यक्ती मन चिंता तणावं न्यूनगंड यासारख्या गोष्टीमुळे व्यक्तीचे मण तानावग्रस्त होत आहे. त्यामुळे घोडेगाव वकील बार असोसिएशन च्या वतीने खेड जुन्नर आंबेगाव तालुक्यातील वकिलांच्या तालुक्यातील संघटनामध्ये क्रिकेटची स्पर्धा आयोजित करण्यात आली होती या लांडेवाडी येथे संपन्न झाली या क्रिकेट स्पर्धेचे उद्घााटन माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांचे हस्ते झाले
खेड वकील संघ घोडेगाव वकील संघ जुन्नर वकील संघ यांचे संघाने स्पर्धेत भाग घेतलेला होता. सदरच्या स्पर्धांमध्ये खेड वकिल संघ विजेता ठरला. उपविजेता जुन्नर वकील संघ ठरला.या स्पर्धा खेळीमेळीच्या उत्साह पूर्ण वातावरणात संपन्न झाली.
या स्पर्धेचे आयोजन घोडेगाव वकील संघाचे अध्यक्ष माननीय अँड. समीर निघोट व कार्यकारिणी यांचे नियोजनाने पार पडला. यावेळी जेष्ठ अँड. बी यस पोखरकर अँड बांगर , अँड वी बी पोखरकर अँड मुकुंद वळसे पाटील अँड. दीपक गावडे, ॲड. प्रमोद काळे, ॲड. माने,घो ॲड. सुमित निकम डेगाव अँड मोरडे वकील संघाचे सर्व सभासद, कार्यकारिणी जुन्नर वकील संघ सदस्य, खेड वकील संघ सदस्य व अनेक वकील वर्ग व इतर मान्यवर उपस्थित होते.