सामाजिक

“भीमाशंकरच्या आदिवासीं शेतकऱ्यांनी पिकवलेली,”सेंद्रिय स्टॉबेरी” आता मिळणार, आदिवासी शालेय मुलांना”…..

Published

on

घोडेगाव दि. (निलेश कान्नव) -आदिवासी शेतकऱ्यांनी पिकवलेली स्टॉबेरी आदिवासी विकास विभागाने विकत घेवून आश्रमषाळोतील मुलांना रोजच्या आहारात दिली आहे. प्रकल्प अधिकारी प्रदिप देसाई यांनी पुढाकार घेवून हा अभिनव कार्यक्रम सुरू केला आहे. 

 भीमाशंकर च्या आदिवासी डोंगरी भागात स्वच्छ, निर्मळ वातावरणात कोणत्याही केमिकल युक्त औषधाचा वापर न  करता कसदार जमिनीत तयार केलेली स्टॉब्रेरी  आदिवासी विकास विभागाने केंद्रवर्ती अर्थसंकल्प योजनेतून आंबेगाव तालुक्याच्या आदिवासी भागातील ५५ शेतक-यांना स्टॉबेरी लागवडीसाठी व साहित्य खरेदीसाठी अनुदान दिले आहे. यातून शेतक-यांनी संपुर्ण संद्रिय स्टॉबेरी पिकवली आहे. हि पिकवलेली स्टॉबेरी शेतकरी भीमाशंकर कडे जाणा-या रस्त्यावर विकतात किंवा पुणे सारख्या मोठया बाजारपेठांमध्ये पाठवत आहेत.

“कोणतेही औषध , खत न मारता संपुर्ण सेंद्रिय पध्दतीने पिकवलेली स्टॉबेरी आज आमच्याच मुलांना खायला मिळत आहे याचा मनापासून आनंद होतोय. प्रकल्प अधिकारी प्रदिप देसाई यांनी पुढाकार घेवून सुरू केलेली योजना आज ख-या अर्थाने आदिवासींच्या कल्याणासाठी राबवली गेली असल्याचे यातून दिसले असे स्टॉबेरी उत्पादक शेतकरी संतोश शेळके यांनी सांगितले.”

प्रकल्प अधिकारी प्रदिप देसाई यांना, हि स्टॉबेरी आपण खरेदी करून आश्रम शाळेतील मुलांच्या आहारात रोज खायला  देवू अशी  कल्पना सुचली. त्यांनी स्टॉबेरी उत्पादक शेतक-यांना  कळवून घोडेगाव येथे सुरू असलेल्या मध्यवर्ती स्वयंपाक गृहात आपण पिकवलेली स्टॉबेरी आणून दया, याठिकाणी वजन करून लगेच पैसे घेवून जा असे अवाहन केले.  याला बोरघर परिसरात  शेतक-यांनी प्रतीसाद दिला व पहिल्याच वर्षी २५ किलो स्टॉबेरी जमा झाली. याठिकाणी वजन करून २३०/- रूपये किलो प्रमाणे त्यांना पैसे देण्यात आले. ते पुढे म्हणाले कि,आदिवासी शेतक-यांनी पिकवलेली स्टॉबेरी आदिवासी मुलांना खायला जात असल्याचा आज मनस्वी आनंद होत आहे,

ते पुढे म्हणाले कि,तसेच शेतकरी देखिल याला चांगला प्रतिसाद देत आहेत. माजी मंत्री दिलीप वळसे पाटील यांनी पुढाकार घेवून हि योजना सुरू करायला लावली व याचा चांगला फायदा षेतक-यांना होत आहे, पुढिल वर्शी जास्तीत जास्त षेतक-यांनी सहभागी झाले पाहिज  असे अवाहन प्रकल्प अधिकारी प्रदिप देसाई यांनी केले. दरम्यान यावेळी सहायक प्रकल्प अधिकरी सोनुल कोतवाल, अधिक्षक विपुल टकले, समाजसेविका जनाबाई उगले हे उपस्थित होते

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Trending

Exit mobile version