सामाजिक

आपल्या गोड आठवणींना उजाळा देत समुद्रकाठी चंद्र प्रकाशात केला “प्रेमदिवस” साजरा…..

Published

on

मंचर (प्रतिनिधी) -समुद्राच्या अप्रतिम सुरेख लाटांच्या सानिध्यात, पलाखलखीत प्रकाशमान चंद्राच्या चंदेरी प्रकाशात जुन्या नव्या गाण्याच्या  बेधुंद स्वरात प्रेमादिनाच्या निमित्ताने दिवे अगार येथे रंगला प्रेमाचा आनंदोत्सोव…..

प्रेम हे प्रेम असत, तुमचं आमचं सेम असत” असे अनेक वेळा अनेक जण म्हणतात त्यात काहीतरी तथ्य असावं कारण प्रेम कोणी कोणावर करावे कसे करावे किती करावे याला काही मर्यादा नंसावी कारण प्रेम म्हणजे त्याग आपल्या जवळच्या व्यक्तीच्या आनंदासाठी सर्वकाही केव्हाही मुक्त हस्ते बहाल निस्वार्थीपणे बहाल करण्याची प्राक्रिया म्हणजेच प्रेम असावं त्यामुळे तर एखादी व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीसाठी सूर्य चंद्र आणण्याची भाषा करतो खरंतर हा वाक्यचा सरळ अर्थ न घेता त्यामागील त्याची निस्वार्थी भावना ओळखणे अत्यावश्यक आहे.

कोकण परिसर जणू मुक्त हस्ताने निसर्गाने यां ठिकाणी सौंदर्याची उधळणच केली आहे त्या ठिकाणच्या पर्वत रांगा बाहरलेली वनराई नागमोडी रस्ते जवळपास  झाडातून सरसर करणारी हवा, पृथ्वीवर मंद मंद अशा हळुवार पसरलेली चंदेरी  प्रकाशाची  चादर दूरवर अथांग समुद्राच्या उसळणाऱ्या लाटा त्या समुद्राच्या पाण्यावर चंद्रप्रकाशाची किरणे पडून मोत्या प्रमाणे चकाकणारे खारं पाणी अशाच यां निसर्ग देवातेने निर्माण केलेल्या वातावरणात प्रेम दिनांनिमित्त आपल्या जिवनसंगिनी सोबत सर्वांसमोर तिच्या नजरेत नजर घालत हळुवार गाण्यांच्या बोलावर हलक्या वातावरणात तिच्यावर करत असलेल्या प्रेमाला व्यक्त करत आपल्या विवाहानंतरच्या काळातील प्रेमळ आठवणींना उजाळा दिला.

आंबेगाव तालुक्यातून काही कुटुंब कोकणच्या भूमीत हवापालटाच्या निमित्ताने दिवे अगार येथे गेली असता निमित्त झाले ते “व्हालेंटाइन डे” चे यां दिनाचे औचित्य साधून येथील एका रिसॉल्ट मध्ये झालेल्या जुन्या नवीन सुमधुर गाण्यांच्या कार्यक्रमात या मंडळींनी आपल्या विवाहां नंतरच्या गोड आठवणीचा ठेवा व्यक्त करीत आपल्या प्रेमाला वाटा व्यक्त करून दिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Trending

Exit mobile version