सामाजिक
कर्मचाऱ्यांमध्ये “सुदृढता,सक्षमता व उत्साह कार्यक्षमता वाढविण्यासाठी “दिवे अगार” येथे अभ्यास दौरा : पराग नागरी पतसंस्थेचा अभिनव उपक्रम……
मंचर दि (प्रतिनिधी) – स्पर्धेच्या युगात कॉर्पोरेट क्षेत्रातील बँकाप्रमाणे वाढत्या स्पर्धेच्या युगात सक्षम, प्रशिक्षित व उत्साही कर्मचारी निर्माण करण्यासाठी “प्रसिद्ध उद्योगपती व संस्थेचे आधार स्तंभ देवेंद्रशेठ शाह” यांच्या मार्गदर्शनानुसार पराग नागरी पतसंस्थेच्या कर्मचारी व संचालक मंडळासाठी आयोजित करण्यात आलेला अभ्यास दौरा राज्यातील पतसंस्था क्षेत्रात एक अभिनव उपक्रम ठरत आहे…..
जीवनाच्या प्रत्येक क्षणी नवनवीन अनुभव घेणे म्हणजेच शिक्षण,. शिक्षण घेण्यासाठी ची काही एक वेळ असे नाही जीवनभर व्यक्ती शिकत असतो व आपले ज्ञान इतरांना देत असतो आपण घेतलेले ज्ञान इतरांना देऊन त्यांना प्रशिक्षित करणे म्हणजेच प्रशिक्षण होय परंतु कोणतेही ज्ञान घेण्यासाठी ज्ञान देणारा व घेणारा, यांना ज्ञान देण्यात व घेण्यात आनंद वाटायला हवा,.
‘खरंतर आजच्या या धावत्या युगामध्ये प्रत्येक व्यक्ती कुठल्याना कुठल्या व्यापात अडकलेला दिसत आहे त्यामुळे तो त्याचे हास्य विसरून गेला आहे कि काय? अशी स्थिती सर्वत्र दिसते यात काही नवीन प्रशिक्षण घेऊन या धावत्या युगात सर्वांसोबत वेगाने चालण्यासाठी तयार राहणे गरजेचे असतें मग ती व्यक्ती असो वा संस्था……
“पराग नागरी पतसंस्थेचे” संस्थापक व आधार स्तंभ, प्रसिद्ध उद्योगापती देवेंद्र शाह यांच्या मार्गदर्शनाखाली संस्थेचे कार्य अविरतपणे सुरु असून या पतसंस्थेने नागरिकांचा विश्वास संपादन करीत अल्पवाधित मोठ्या प्रमाणावर ठेवी गोळा करून, त्याद्वारे नियमानुसार विविध छोट्या मोठ्या अनेक व्यवसाईकांना मदतीचा हात आहे त्यामुळे अनेक उद्योजक आपल्या व्यवसायात यशस्वीपणे काम करीत आहेत. त्यामुळे ठेवीदार व कर्जदारांसोबत आंबेगाव तालुक्यातील जण माणसाच्या मनात अल्पवाधित नांवलौकिक मिळवून विश्वास संपादन केला आहे.
दरम्यान आजच्या स्पर्धेच्या काळात मोठमोठया बँका पतसंस्थापुढे पराग पतसंस्थेची सक्षमपणे प्रगती व्हावी. यासाठी संस्थेचा कर्मचारी अधिकाधिक उत्साही, आनंदी व सक्षम, प्रशिक्षित असला पाहिजे त्यासाठी त्याला प्रशिक्षित करणे गरजेचे आहे व हे प्रशिक्षण देताना कर्मचाऱ्याच्या मनावर तणाव, दबाव अथवा न्यूनगंड निर्माण होता कामा नये. तसेच कर्मचाऱ्यांमध्ये स्वत:च्या सुरक्षितेची तर संस्थेविषयी अस्थेची, आपलेपणाची भावना सुदृढ रहावी या उद्देशाने संस्थेचे अध्यक्ष जितेंद्र बांगर यांनी पतसंस्थेतील सर्व संचालक व कर्मचाऱ्यांची प्रशिक्षण सहल “दिवे अगार” यां ठिकाणी आयोजित केली होती. या सहलीच्या निमित्ताने मोकळ्या वातावरणात कर्मचारी व संचालक एकत्रित येऊन यांच्यातील एकमेकांमध्ये सुसंवाद वाढेल व त्यातून संस्थेच्या प्रगतीविषयी एकत्रितपणे नियोजनबद्ध ध्येय धोरण ठरवून ते साकारण्यासाठी सक्षम प्रयत्न केले जातील. हा उद्देश उरी बाळगून म्हणून या प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी आपले मनोगत व्यक्त करताना संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सदाशिव भुसारी म्हणाले कि, प्रशिक्षित व उत्साही कर्मचारी हा कोणत्याही संस्थेच्या प्रगतीचे द्योतक आहे. संस्थेचा माध्यमातून आयोजित उपक्रमामुळे कर्मचाऱ्याच्या व त्यांच्या कुटुंबियांच्या मनात सुरक्षितेची भावना वाढीस लागून संस्थेविषयी आपुलकी व निष्ठा निर्माण होईल व कर्मचारी संस्थेच्या प्रगतीसाठी जीव ओतून काम करेल, यातून संस्थेचा नावलौकिक वाढून संस्था यशस्वीतेच्या शिखरांवर नेण्यासाठी चांगली मदतच होईल.
दरम्यान संस्थेच्या वतीने आयोजित केलेल्या प्रशिक्षण शिबिरास महाराष्ट्र राज्य बँकिंग फेडरेशन चे हिरामान ढोरे, यांनी पतसंस्थेच्या विषयी मार्गदर्शन केले या वेळी पतसंस्थेचे मुख्यकार्यकारी अधिकारी सदाशिव भुसारी, सर्वश्री संचालक बाबाजी टेमगिरे, विकास भोर, समीर घेवडे, सौ ललिता थोरात, संतोष निकम, अनिल लबडे, उपस्थित होते.