सामाजिक
बी.डी.काळे महाविद्यालयातील तीन विद्यार्थीनी मुंबई पोलीस दलात दाखल.
घोडेगाव दि (प्रतिनिधी) – घोडेगाव येथील बी.डी.काळे महाविद्यालयातील तीन माजी विद्यार्थिनींची महाराष्ट्र पोलीस मुंबई पोलीस दलात नुकतीच निवड झाली आहे.
राज्यशास्त्र विभागातील माजी विद्यार्थिनी सपना बांबळे (गोहे खुर्द) तसेच वाणिज्य विभागातील अनिता शिवाजी हुले (लांडेवाडी पिंगळवाडी), आरती हरिष्चंद्र गावडे (गावरवाडी) या तीन माजी विद्यार्थिनींची मुंबई पोलीस दलात नुकतीच निवड झाली आहे. त्यांच्या या यशाबद्दल आंबेगाव तालुका विद्या विकास मंडळाचे अध्यक्ष तुकाराम काळे,उपाध्यक्ष अँड संजय आर्विकर, सचिव विश्वासराजे काळे, कार्याध्यक्ष सुरेशशेठ काळे, महाविद्यालय विकास समितीचे चेअरमन अँड मुकुंदराव काळे, प्राचार्य डॉ.ज्ञानेश्वर वाल्हेकर, उपप्राचार्य डॉ.बाळासाहेब गव्हाळे, राज्यशास्त्र विभागाचे समन्वयक सुनिल नेवकर, वाणिज्य विभागाचे समन्वयक सूर्यकांत कदम इत्यादींनी त्यांचे अभिनंदन केले आहे.