सामाजिक
घोडेगाव येथील जि प प्राथमिक शाळेच्या विद्यार्थ्याकडून “शिवजयंती” उत्साहात संपन्न.
घोडेगाव दि (प्रतिनिधी) – येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती निमित्ताने विविध सांस्कृतीक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते यां प्रसंगी येथील जि प प्राथमिक शाळेच्या विद्यार्थ्यांनी विविध विविध नृत्य गिते सादर करीत विविध कार्यक्रमांचे आयोजन केले.
अखंड हिंदुस्थानचे मान बिंदू छत्रपती सगवाजी महाराज यांच्या जयंती निमित्ताने चोडेगाव येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा घोडेगाव येथे शिवजयंती उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला यावेळी छत्रपती शिवरायांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून दीप प्रज्वलन करण्यात आले . त्यानंतर संपूर्ण गावातून भगवे झेंडे व घोषणा देत ढोल ताशाच्या गजरात पारंपारीक पद्धतीने भव्य मिरवणूक काढण्यात आली .हर हर महादेव… छत्रपती शिवाजी महाराज कि जय…आदी घोषणा देत संपूर्ण परिसर दणानून सोडण्यात आला होता. जोशी पूर्ण वातावरणात विविश सांस्कृतीक कार्यक्रमाचे आयोजन करीत तरुणांईने आपला सहभाग प्रचंड प्रमाणावर नोंदवीला.
दरम्यान यावेळी शिवरायांनवर पोवडा व गिते सादर केली ध्वज क्षिरसागर , कृष्णा कुंभार , आयुषमान बोऱ्हाडे , कुमारी संध्या वारे यांनी सहभाग नोंदवीला तसेच जिल्हा परिषदेच्या विदयार्थिनींनी शिवरायांचा झुलता पाळणा यांसह विविध नृत्य गिते सादर केली. त्यानंतर विद्यार्थ्याना ग्रामपंचायतच्या वतीने दुध व महाराणी मंडळाच्या वतीने खाऊ वाटप करण्यात आले.
यावेळी घोडेगाव चे कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक सोमनाथ भाऊ काळे आंबेगाव मनसे अध्यक्ष श्री संतोष बोराडे,सरपंच सौ.अश्विनी तिटकारे, उपसरपंच श्री.कपिल भाऊ सोमवंशी मा.उपसरपंच श्री.सुनील इंदोरे ,ग्रामपंचायत सदस्य श्री .अमोल भाऊ काळे, श्री.स्वप्नील घोडेकर सौ.सारिकाताई घोडेकर, सौ. नंदाताई काळे , श्रीमती संगीताताई भागवत , सौ .जोत्स्ना डगळे , श्री. शोनु गाढवे , शालेय व्यवस्थापन अध्यक्ष हेमंत काळे , मा अध्यक्ष संजय काळे , श्री . गजानन काळे , शिवभक्त श्री . गणेश माटे , मुख्याध्यापक श्रीमती अलका चासकर , श्री .राजाराम काथेर , श्रीमती सुनिता काठे , श्रीमती ललिता शेळके , श्री .मंगेश कुंभार सौ .दक्षायणी सुर्यवंशी अंगणवाडी सेविका जयश्री कर्पे व त्यांचे बालचमु उपस्थित होते .
Sudhir kale
February 20, 2025 at 5:27 am
सगवाजी please check the spellings
मा.संतोषभाऊ बोऱ्हाडे
February 20, 2025 at 7:20 am
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा घोडेगाव यांनी अत्यंत उत्साहात अशी शिवजयंती अत्यंत उत्साहात साजरी केलेली आहे .त्या लहान मुलांचे आणि त्यांचे शिक्षकांचे मनापासून आभार !