सामाजिक

शरद बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र देशमुख,”सहकार महर्षी मा. आमदार दत्तात्रय वळसे (पाटील)” पुरस्काराने सन्माणीत….

Published

on

मंचर दि (प्रतिनिधी) येथील  संस्कार फाउंडेशन चे  वतीने शरद बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी  राजेंद्र देशमुख यांना  “माजी आमदार सहकार महर्षी दत्तात्रय गोविंदराव वळसे “पाटील)” सहकार भूषण पुरस्काराने गौरवण्यात आले 

सहकार क्षेत्रात अग्रगण्य बँक म्हणून ओळख पावलेल्या  शरद सहकारी बँकेचा कर्मचारी  प्रशिक्षण कार्यक्रम व स्नेह मेळावा नुकताच  मंचर येथे संपन्न झाला.यावेळी संस्कार फाउंडेशन चे वतीने मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र देशमुख यांना सहकार महर्षी यां पुरस्कारने सन्माणीत करण्यात आले यां पुरस्काराचे वितरण पुणे  जिल्हा  परिषदेचे मा उपाध्यक्ष व बँकेचे उपाध्यक्ष विवेक वळसे पाटील,अतिरिक्त आयुक्त व विशेष निबंधक सहकारी संस्था महाराष्ट्र राज्य पुणे चे शैलेश कोथमीरे, व संस्कार फाऊंडेशन चे अध्यक्ष व शरद बँकेचे संचालक अजय घुले  यांचे हस्ते करण्यात आले.

यावेळी आपले मनोगत व्यक्त करताना, अतिरिक्त आयुक्त व विशेष निबंधक सहकारी संस्था महाराष्ट्र राज्य पुणे चे शैलेश कोथमीरे यांनी नागरी बँक पुढील आव्हाने व त्यावरील उपाययोजना यावर मार्गदर्शन केले.तर पुणे जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष विवेक वळसे पाटील यांनी आपले मनोगत व्यक्त करताना,बँकेतील कर्मचाऱ्यांच्या कामाची गती व याद्वारे बँकेची होत असलेली प्रगती पाहून  माजी मंत्री दिलीप वळसे पाटील, व  शरद बँकेचे अध्यक्ष देवेंद्र शहा यांच्या वतीने बँकेचे सीईओ राजेंद्र देशमुख व इतर सर्व सेवकांचे कामाचे कौतुक केले . तसेच पीडीसी बँकेचे जनरल मॅनेजर अंकुश शिंदे यांनी बँकेचे प्रगतीसाठी अधिकारी व कर्मचारी यांच्यातील समन्वय उपस्थितांना बहुमोल याबाबत मार्गदर्शन केले.

दरम्यान  बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र देशमुख यांनी सत्कारला उत्तर देताना सर्वांचे आभार व्यक्त करीत  पुढील काळात सर्वांना बरोबर घेऊन बँकेची अधिकाधिक प्रगती करण्याच्या दृष्टीने कसोशीने प्रयत्न करणार असल्याचे देशमुख यांनी सांगितले  दरम्यान यावेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन व कार्यक्रमाचे उद्घाटन संपन्न झाले.

  याप्रसंगी  शरद बँकचे सर्वश्री  संचालक दत्ता थोरात , दौलतभाई लोखंडे, सुषमा शिंदे, रूपाली झोडगे ‘ तर  शरद बँकेचे उपकार्यकारी अधिकारी बाबासाहेब जाधव,यांचे सह  बँकेचे अधिकारी अश्विनी भोर, जयराम दैने, पोपट पोखरकर, अजीत देवकर, राजाराम डेरे ‘ सचिन जाधव, अभय आवटे, रविंद्र नाईकडे, यांसह शरद बँकेचे सर्व सेवक कर्मचारी वृंद उपस्थित होते.कार्यक्रमाचे प्रास्ताविक उपमुख्य कार्यकारी अधिकारी बाबासाहेब जाधव यांनी केले. 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Trending

Exit mobile version