सामाजिक

मंचर येथील महात्मा गांधी विद्यालयात “राष्ट्रीय विज्ञान दिन उत्साहात साजरा”!!!       

Published

on

मंचर:दि (प्रतिनिधी)- येथील  रयत शिक्षण संस्थेच्या “महात्मा गांधी विद्यालय व ज्युनिअर कॉलेज” येथे राष्ट्रीय विज्ञान दिन साजरा करण्यात आला        

भारताचे थोर वैज्ञानिक “भारतरत्न सी व्ही रामण” यांनी लावलेल्या “रामन इफेक्ट” या शोधामुळे त्यांना दिवशी नोबेल प्राईज मिळाले. म्हणून 28 फेब्रुवारी हा दिवस राष्ट्रीय विज्ञान दिन म्हणून साजरा केला जातो. यां  विज्ञान दिनाचे औचित्य साधून मंचर येथील महात्मा गांधी विद्यालयाच्या प्रारंगणात या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते 

 दरम्यान उप मुख्याध्यापिका सुरेखा भांगरे व पर्यवेक्षक यादव चासकर यांनी डॉ.सी.व्ही.रामन यांच्या प्रतिमेचे पूजन केले . तसेच त्यांना अभिवादन करण्यात आले. थोर शास्रज्ञ सी व्ही रामन यांच्या जीवनातील विविध कार्यांना अनेक  विद्यार्थ्यांनी केलेल्या आपल्या  भाषणातून  उजाळा दिला. सी व्ही रामन  यासारख्या थोर वैज्ञानिकांमुळे आपल्या देशाचे नाव संपूर्ण जगामध्ये मोठे झाले अशा या थोर व्यक्तीला कोटी कोटी प्रणाम असे गौरवोद्गार विद्यालयाचे पर्यवेक्षक यादव चासकर यांनी यावेळी मनोगत व्यक्त केले 

  यावेळी सर्व कर्मचारी व शिक्षक वृंद उपस्थित होते कार्यक्रमाचे नियोजन आश्रफखान पठाण, धीरज कोळेकर,निवृत्ती बांगर,कल्याणी बांगर,उज्वला हुले,मनीषा थोरवे,मयूरी क्षीरसागर,गोरक्ष केदारी,एकनाथ चव्हाण,पौर्णिमा सावंत व सर्व गणित व विज्ञान शिक्षकांनी केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Trending

Exit mobile version