सामाजिक

सरपंच स्व. संतोष देशमुख यांच्या हत्येच्या निषेधार्थ  मंचर येथे शिवसेनेच्या  वतीने आरोपींना फाशीच्या मागणीसह  “जोडे मारो” आंदोलन !!

Published

on

मंचर दि. (प्रतिनिधी) , (बीड) येथील आदर्श सरपंच स्व.संतोष देशमुख यांच्या अमानुष हत्येच्या निषेधार्थ आणि मुख्य आरोपी वाल्मीक कराड व त्याच्या साथीदारांना फाशीची शिक्षा द्यावी या मागणीसाठी शिवसेना (शिंदे गट), युवासेना, महिला आघाडी आणि सर्व अंगीकृत संघटना, आंबेगाव तालुका यांच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज चौक, मंचर येथे “जोडे मारो” आंदोलन करण्यात आले.

गेली अनेक महिण्यापासुन वाल्मिक कराड व त्याचे साथीदार यांनी सरपंच स्व संतोष देशमुख यांच्यावर अमानुष अत्याचार करून हत्या केली याचे निषेधार्थ मंचर येथील शिवाजी चौकात शिवसेना शिंदे गटाच्या वतीने मुख्य आरोपी वाल्मीक कराड यांच्या प्रतीकात्मक प्रतिमेला जोडे मारून तीव्र संताप व्यक्त करत आंदोलन करण्यात आले यावेळी उपस्थित कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी करत या हत्येचा तीव्र निषेध नोंदवला आणि आरोपींना तात्काळ फाशीची शिक्षा द्यावी, अशी जोरदार मागणी केली.

दरम्यान या आंदोलनाच्या माध्यमातून सरपंच स्व.संतोष देशमुख यांच्या हत्येतील आरोपींना फास्ट ट्रॅक न्यायालयात सुनावणी घेऊन तातडीने फाशीची शिक्षा द्यावी, मस्साजोग येथील ग्रामस्थांच्या सुरक्षेसाठी विशेष उपाययोजना कराव्यात आणि गुन्हेगारांचा बंदोबस्त करून कायदा व सुव्यवस्था कायम ठेवावी, अशी मागणी करण्यात आली.

https://bobhatanews.in/wp-content/uploads/2025/03/1000451162.mp4

त्याचप्रमाणे या आंदोलनात युवासेना राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्य सचिन बांगर, शिवसेना तालुकाप्रमुख प्रविण थोरात पाटील, शिवसेना उपजिल्हाप्रमुख अजित चव्हाण, युवासेना उपजिल्हाप्रमुख कल्पेश बाणखेले, शिवसेना मंचर शहरप्रमुख संदिप जुन्नरे, महिला आघाडीच्या नेत्या सौ.सुरेखाताई निघोट, शिवसेना उपतालुकाप्रमुख किरण ढोबळे, संजीव थोरात, युवासेना शहरप्रमुख माऊली लोखंडे, प्रदिप डोके, पंकज बाणखेले यांच्यासह शिवसेनेचे अनेक पदाधिकारी, शिवसैनिक, युवासैनिक, महिला आघाडीच्या कार्यकर्त्या तसेच आंबेगाव तालुक्यातील विविध गावांतील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Trending

Exit mobile version