सामाजिक

श्रीमती मेरीफ्लोरा डिसुझा “आदर्श प्राचार्य” पुरस्काराने सन्मानीत: “डॉ. किरण बेदी व सायना नेहवाल” यांच्या हस्ते झाले पुरस्काराचे वितरण…..

Published

on

घोडेगावदि (प्रतिनिधी) -येथील आंबेगाव तालुका विद्या विकास मंडळ संचलित, ,”न्यू इंग्लिश मीडियम स्कूल” या विद्यालयाच्या प्राचार्या श्रीमती “मेरी फ्लोरा डिसोजा” यांना, इंडियन ओलंपियाड फाउंडेशन यांच्यावतीने राष्ट्रीय स्तरावरील आदर्श प्राचार्य पुरस्काराने सन्माणीत करण्यात आले 

इंडियन ओलंपियाड फाउंडेशन यां संस्थेच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या या पुरस्कृसाठी संपूर्ण देशभरातून एकूण १००० प्राचार्यांची निवड या करण्यात आली होती.यात देश पातळीवर त्यांच्या उत्कृष्ठ कार्याची दाखल घेत मुंबई येथे आयोजित भव्य पुरस्कार वितरण समारंभात  देशाच्या पहिल्या महिला आयपीएस ऑफिसर डॉ. किरण बेदी यांच्या शुभहस्ते व भारतीय बॅडमिंटन पटू सायना नेहवाल यांच्या उपस्थितीत आदर्श प्राचार्या यां पुरस्काराने श्रीमती मेरी दिसोजा यांना सन्माणीत करण्यात आले.

दरम्यान या पुरस्काराचे निमित्ताने  घोडेगाव महाविद्यालया च्या आवारात आयोजित कार्यक्रमात श्रीमती दिसोजा यांचा आंबेगाव तालुका विद्या विकास मंडळ संस्थेचे अध्यक्ष तुकाराम काळे, उपाध्यक्ष संजय आर्वीकर ,कार्याध्यक्ष सुरेश काळे, संस्थेचे सचिव विश्वास काळे,संस्थेचे समन्वय समितीचे चेअरमन राजेश काळे, कोषाध्यक्ष सोमनाथ काळे, वस्तीगृह कमिटीचे चेअरमन  सूर्यकांत गांधी, संस्थेचे जॉइंट सेक्रेटरी प्रशांत काळे,

दरम्यान घोडेगाव न्यू इंग्लिश मेडीयम स्कूलचे चेअरमन बाळासाहेब काळे, संस्थेचे संचालक अजित काळे व अक्षय काळे , बी.डी. काळे महाविद्यालयाचे चेअरमन मुकुंद काळे यांनी घोडेगाव मध्ये संस्थेच्या वतीने त्यांच्या या उत्कृष्ट कामगिरीबद्दल सत्कार केला. तसेच याप्रसंगी न्यू इंग्लिश मेडियम स्कूलच्या उपप्राचार्या रेखा आवारी, पर्यवेक्षिका वंदना वायकर, सर्व शिक्षक, विद्यार्थी व शिक्षकेतर सेवक वर्ग उपस्थित होते. विद्यालयाच्या पालक शिक्षक संघाच्या सर्व सदस्यांनी प्राचार्या  मेरी फ्लोरा डिसोजा यांचे अभिनंदन केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Trending

Exit mobile version