सामाजिक
अवसरी खुर्द येथे “रमजान निमित्त” शेकडो मुस्लिम बांधवांनी केले नमाज पठण….
मंचर दि(प्रतिनिधी सदानंद शेवाळे): पासून जवळच असलेल्या अवसरी खुर्द (ता. आंबेगाव) येथे रमजान ईद निमित्त ईदगाह मैदानावर मोहम्मद अंजार असम यांनी नमाज पठण केले याप्रसंगी मुस्लिम समाजाचे जेष्ठ मंडळी व तरुण मोठ्या संख्येने उपस्थित होते.
“अवसरी खुर्द येथे रमजान ईद निमित्त मुस्लिम बांधवांना शुभेच्छा देताना पोलीस प्रशासन”
तालुक्याच्या पूर्व भागात अवसरी खुर्द, अवसरी बुद्रुक गावात मोठ्या प्रमाणात मुस्लिम बांधव राहत असून काही मुस्लिम बांधव पारंपारिक व्यवसाय करतात तर तरुण मुलं उद्योग व्यवसाय निमित्त पुणे मुंबई येथे वास्तव्यास असतात मात्र रमजान ईद सणाला आवर्जून गावाला येत असतात अवसरी खुर्द च्या शेरी वस्ती येथे मोठ्या प्रमाणात मुस्लिम बांधव राहत असून जुने वयस्कर लोक शेतीबरोबरच दुग्ध व्यवसाय करत आहेत.
दरम्यान आज रमजान ईद निमित्ताने मुस्लिम बांधवांचे नमाज पठण झाल्यानंतर सरपंच वैभव वायाळ, उपसरपंच प्रवीण भोर, पंचायत समिती माजी उपसभापती संतोष भोर, भिमाशंकर साखर कारखान्याची संचालक आनंदराव शिंदे, नाना होनराव यांनी मुस्लिम बांधवांना गुलापुष्प देऊन रमजान ईद च्या शुभेच्छा दिल्या दुपारी बारानंतर मुस्लिम बांधवांच्या घरात शेरखुर्माचा बेत ठेवण्यात आला होता.
यासाठी परिसरातील हिंदू बांधवांनी मोठी गर्दी केली होती. अवसरी बिट जमादार तान्हाजी हगवणे यांनी चौक बंदोबस्त ठेवण्यात आला होता.ईदगाह मैदानावर नमाजपठण करण्यासाठी मुस्लिम समाजाचे नेते शरीफ मोमीन ,याकूब मुलानी, बाबू मन्यार,बना इनामदार,अशिफ मोमीन, शाकीर जमादार, अलगम मण्यार, भैया शेख सलीम मोमीन यांनी नियोजन केले होते. नमाज पठण झाल्यानंतर गावचे सरपंच वैभव वायाळ, उपसरपंच प्रवीण भोर यांनी मुस्लिम बांधवांचे गुलाब पुष्प देऊन रमजान ईद निमित्त शुभेच्छा दिल्या.