सामाजिक
विजय बंडवाल याच्या विस्फोटक खेळीने पी.सी.एम.सी. संघाचा दणदणीत विजय
भोसरी दि. (नेहे पाटील) पुणे जिल्हा क्रिकेट असोसिएशन यांच्या वतीने सुरू असलेल्या सदू शिंदे लीग २०२५ क्रिकेट स्पर्धा मध्ये विजय बंडवाल याने पन्नास चेंडूत आठ षटकार व सहा चौकार मारून ९४ धावांची तुफानी खेळी करत विजय मिळविला.
ए.के. ग्राउंड साळुंबरे या ठिकाणी पिंपरी चिंचवड महापालिके ने सहभाग घेतला असून, महानगरपालिकेने यात सुरु असलेल्या साखळी सामन्यामध्ये रॉयल स्पोर्ट्स क्लब यांच्या विरुद्ध 217 धावांनी दणदणीत विजय मिळवला आहे, यां सामन्यांमध्ये विजय बंडवाल यांनी ५o चेंडू मध्ये ८ षटकार व ६ चौकार च्या मदतीने ९४ धावाची तुफानी खेळी करून सामनावीर चे पारितोषक मिळवले आहे.
दरम्यान पी.सी.एम.सी. संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करून ४२ षटकांमध्ये ३२५ धावा केल्या, पिंपरी चिंचवड महानगरपालिकेची आतापर्यंतची शिंदे लीग मधील सर्वोत्तम खेळी होती, पिंपरी चिंचवड महानगरपालिका संघाच्या वतीने विजय बंडवाल ९४, पलाश शिंदे ४८, ओंकार कहाणे ४७ सचिन लोणे २४ ओंकार देशमुख १५, महेश कुदळे ११, प्रीतम बिराजदार ११, ओंकार पवार १० धावा करून ४१.४ षटकामध्ये विक्रमी ३२५ धावा केल्या. प्रत्युत्तर दाखल रॉयल स्पोर्ट्स क्लब संघाचा २४.४ षटकांमध्ये १०८ धावामध्ये संपुर्ण संघ गारद झाला. यात हिरा चौधरीच्या ५१ धावा व्यतेरिक्त कोणालाही मोठी धाव संख्या उभारता आली नाहीं.
दरम्यान पी.सी.एम.सी. संघाच्या. गोलंदाजी मध्ये गणेश कापसे यांनी अचुक टप्प्यावर गोलंदाजी करत ३ बळी मिळवले, त्याला राहुल चावरिया २, महेंद्र गायकवाड, कृष्णा चव्हाण, प्रीतम बिराजदार व सचिन लोणे यांनी प्रत्येकी १ बळी घेऊन सुरेख साथ दिली.