सामाजिक
ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी विज्ञानातील संशोधनातील कार्यात सहभागी व्हावे – रुपेश लबडे
घोडेगाव : ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांमध्ये तल्लख बुद्धिमत्ता पहाता. अशा विद्यार्थ्यांनी डॉक्टर, इंजिनियर यापेक्षाही वैज्ञानिक संशोधनामध्ये आपले आपली बुद्धिमत्ता वापरली तर त्याचा समाजास व आपल्या देशात खूप फायदा होईल,तसेच वैज्ञानिक संशोधन हा देखील विद्यार्थ्यांना त्यांच्या भविष्यासाठी उत्तम पर्याय आहे.असे प्रतिपादन आयुका संस्थेचे रुपेश लबडे यांनी केले.
आंबेगाव तालुका विद्या विकास मंडळ संचलित न्यू इंग्लिश मिडीयम स्कूल चे वतीने ६वी ते ८वी च्या विद्यार्थ्यांसाठी दोन दिवसांच्या उन्हाळी शिबिराचे आयोजन (दि.८व ९ रोजी) करण्यात आले.यावेळी झालेल्या कार्यक्रमात लबडे बोलत होते यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी शाळेचे चेअरमन मा. बाळासाहेब काळे विद्यालयाच्या प्राचार्या श्रीमती मेरी फ्लोरा डिसोजा, उपप्राचार्या रेखा आवारी, विद्यालयातील शिक्षक व विद्यार्थी इत्यादी उपस्थित होते.
यावेळी लबडे यांनी आपले मनोगत व्यक्त करताना सांगितले कि, ग्रामीण भागातील विद्यार्थी संशोधन क्षेत्रात येणे आवश्यक आहे. अनेक सोयी सुविधाचा आभाव असताना देखील ग्रामीण भागातील विध्यार्थ्यांची तल्लख बुद्धीमत्ता पहाता त्यांनी डॉकटर इंजिनिअर हे लक्ष न ठेवता संशोधन क्षेत्रात काम करण्याची आवश्यकता आहे. असे त्यांनी सांगितले यावेळी विद्यार्थ्यांना दोन दिवसात होणाऱ्या शिबिराबद्दल तसेच आयुका केंद्राबद्दल व इयत्ता दहावी नंतर विद्यार्थ्यांनी खगोलशास्त्र या विषयाचा अभ्यास कसा करावा याविषयी बहुमोल मार्गदर्शन केले.
दोन दिवस चाललेल्या यां शिबिरामध्ये प्रत्येक विद्यार्थ्याला दुर्बिणीद्वारे सूर्य स्पॉट दाखवण्यात आला विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन, दैनंदिन जीवनामध्ये असणारा विज्ञानाचा वापर, विज्ञान विषयांबरोबर भविष्यात उपलब्ध असणारे शैक्षणिक पर्याय, तसेच मॉडेल मेकिंग इत्यादी गोष्टींचा समावेश याविषयीची माहिती दोन दिवसाच्या शिबिरामध्ये देण्यात आली
दरम्यान विद्यार्थ्यांनी अतिशय आनंदामध्ये खेळीमेळीच्या वातावरणामध्ये हे शिबिर पूर्ण केले. या शिबिराच्या यशस्वीतेसाठी संस्थेचे अध्यक्ष तुकाराम काळे,उपाध्यक्ष संजय आर्वीकर, कार्याध्यक्ष सुरेश शेठ काळे, संस्थेचे सचिव विश्वास काळे, जॉईंट सेक्रेटरी प्रशांत काळे, समन्वय समिती चेअरमन राजेश काळे, संस्थेचे खजिनदार सोमनाथ काळे,वस्तीगृह कमिटीचे चेअरमन सूर्यकांत गांधी, संचालक अजित काळे व अक्षय काळे यांचे योगदान लाभले. तसेच शाळेतील विज्ञान शिक्षक कैलास जाधव, सौ.हुदा शेख, श्रीमती सुषमा थोरात, सौ स्मिता पवळे, सौ ज्योती रोकडे यांचे विद्यार्थ्यांना मोलाचे मार्गदर्शन लाभले या शिबिराच्या उद्घाटन प्रसंगी संस्थेचे .कार्यक्रमाचे प्रास्ताविक व स्वागत कु.अनुष्का लांघी व कु.अस्मि राऊत यांनी केले.