सामाजिक
“पराग”(गोवर्धन) समुहाचे, बांधकाम उद्योगात दमदार पदार्पण…! मंचर येथे पूजन डेव्हलपर्स च्या “औरम” प्रकल्पाची उत्साहात सुरुवात…!!!
मंचर दि. (प्रतिनिधी) उगवत्या सूर्याच्या सुवर्ण छटा मुळे जसे विश्व् सुवर्णमयी किरणांनी उजाळून टाकावे त्याच प्रमाणे सर्वसामान्य व्यक्तीचे जीवन्मान उंचावण्याच्या दृष्टीने मंचर ता आंबेगाव येथे पराग (गोवर्धन ) समूहाचे चेअरमन देवेद्र शाह यांनी पूजन डेव्हलोपर्स चे माध्यनातून “ऑरम” या प्रकल्पाची सुरुवात करून बिल्डर उद्योगात पदार्पण केले आहे.
” उद्घाटनाचे दिवशीच नागरिकांकडून मोठया प्रमाणात बुकिंगला प्रतिसाद मिळाला असल्याची माहिती प्रकल्पाचे संचालक पूजन शाह यांनी दिली “
सर्वच व्यक्ती उद्योग व्यवसायासाठी शहरी भागाची निवड करतात परंतू देवेंद्र शाह यांनी नेहमीच प्रामुख्याने ग्रामीण भागाताच नवीन व्यवसायाची सुरुवात करून त्यात यशस्वी झाले आहेत. यातून ग्रामीण भागात उद्योग व्यवसाय सुरु होऊन ग्रामीण भागातील तरुण पिढीला आपले गाव सोडून शहरी भागात जायला लागू नये कारण त्यामुळे त्या मागे असणाऱ्या त्या तरुणांच्या मुले पत्नी आई वडील यांना त्रास सहानुभूती करावा लागतो त्यापेक्षा ग्रामीण भागातील तरुण पिढीला आपल्या परिसरात नोकरी अथवा व्यवसायास वाव मिळवून दिला तर ग्रामीण भाग सक्षम होईल व यातूनच सक्षम देश होईल असे देवेंद्र शाह यांना वाटते.
दरम्यान आपल्या कुटुंबाचे जीवन्मान उंचवावे यासाठी ग्रामीण भागात नोकरी अथवा व्यवसाय करणारा राहणारा व्यक्ती आपल्या मुलांचे जीवन माण उंचवण्यासाठी आपले कुटुंब शहरात नेतो व स्वतः मात्र आपल्या नोकरी व्यवसायासाठी शहरातून आपल्या व्यवसायाच्या अथवा नोकरीच्या ठिकाणी ये जा करतो त्यामुळे ग्रामीण भागातच त्यांच्या कुटुंबाला सर्व सुविधा मिळून त्यांचे कुटुंबाचे जीवन मान उंचवावे यासाठी मंचर याठीकाणी या सर्वसुविधा युक्त प्रकल्पची सुरुवात करण्यात आली असल्याचे शाह यांनी सांगितले
ग्रामीण भागातील नैसर्गिक साधन संपत्तीचा ऱ्हास न करता याच नैसर्गिक साधन संपत्ती मानवाच्या दृष्टीने उपयोग करीत पूजन डेव्हलोपर्स या नावाने मंचर येथे सुरु केलेल्या “ऑराम” प्रकल्पामध्ये सर्वसामान्य जनतेचे जीवनमान उंचावान्याचा दृष्टीने विविध सुविधा दिल्या आहेत यामुळे या ठिकाणी राहणाऱ्या कुटुंबाची जीवनशैली उंचावेल व आकर्षक किमतीमध्ये सर्व सुविधा युक्त घरे सर्व समान्य कुटुंबातील व्यक्तींना परवडेल या किंमत्तीमध्ये देण्यात येणार आहेत यात विविध सुविधा देण्यात येणार असून यात प्रामुख्याने प्रकल्पला आकर्षक द्वार व या ठिकाणी पाण्याच्ये आकर्षक फवारे, तसेच कलब हाऊस तसेच विविध कार्यक्रमासाठी हॉल, प्रशस्त मोकळ्या हवेची जागा, खेळासाठी मैदान, निसर्गाच्या सानिध्यात डोंगरी पाऊलवाट, विविध मनमोहक वृक्षाची फुल झाडांनी युक्त आकर्षक वनराई, चोहोबाजूने मनाला प्रसन्नता व आनंद निर्माण करणाऱ्या आकर्षक डोंगरी टेकाड्यांचे समूह,निसर्गरम्य दृश्य डेक, या नैसर्गिक सुविधा सोबत कॉफ़ी शॉप, व्यायाम शाळा(जिम) सोबत बॅटमींटन, योगा, धावपट्टी(जॉगिंग ट्रॅक), ध्यानधारणा हॉल याही सुविधा देण्यात येणार आहेत त्यासोबत सिनेमा गृह, मुलांसाठी मैदान, बसण्यासाठी आरामदायी जागा, विजेचे बिल कमी करण्यासाठी वीज सोलर सिस्टम वीज निर्मिती प्रकल्प ,सांस्कृतीक हॉल, यासोबत अनेक विविध सुविधा देण्यात येणार आहेत.
कोणताही उद्योग व्यवसाय सुरु करताना त्या मागचा हेतू शुद्ध असणे खूप महत्वाचे आहे. यात समाज हिता सोबत निसर्गाचे हित जोपासाने हि अत्यावश्यक आहे.त्यामुळे नैसर्गिक साधन संपत्तीचा अपव्यय न होता त्याचे पालन होऊन येथील सर्व सामान्य व्यक्तीच्या कुटुंबाचे जीवन्मान उचवावे हे द्येय डोळ्यासमोर ठेवून हा प्रकल्पाची निर्मिती करणार असल्याचे देवेंद्र शाह यांनी सांगितले.
दरम्यान उगवत्या सूर्याची सुवर्णमयी किरणे म्हणजेच “औरम” होय. प्रसिद्ध उद्योगपती देवेंद्र शाह यांच्या संकल्पनेतून साकरत असलेल्या या नव्या प्रकल्पमुळे बिल्डिंग व्यवसायातून भविष्यात मोठी क्रांती होऊ शकते यात शंका नाही. ग्रामीण भागात शहरी भागात निर्माण होणाऱ्या प्रकल्पापेक्षाअत्याधुनिक सुविधा माफक किंमतीत ग्रामीण भागात देऊन बांधकाम व्यवसायात मोठे बदल पुढील काळात शाह यांच्या या प्रजेक्ट मुले होण्याची शक्यता आहे.
या प्रकल्पाचे उदघाटण प्रसंगी माजी मंत्री दिलीप वळसे पाटील, माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील मंचरचे माजी सरपंच दत्ता गांजाळे, माजी पंचायत समिती सदस्य राजाराम बाणखेले, राष्ट्रवादी काँग्रेस आंबेगाव तालुका अध्यक्ष विष्णुशेठ हिंगे या सोबत जिल्ह्यातील अनेक राजकीय सामाजिक शौक्षणिक औद्योगिक क्षेत्रातील प्रतिष्ठित मान्यवर उपस्थित होते
मा.संतोषभाऊ बोऱ्हाडे
May 11, 2025 at 4:22 pm
नविन प्रकल्पा करीता मनसे शुभेच्छा ! गोवर्धन डेअरी प्रमाणेच या क्षेत्रात सुद्धा विश्व तयार कराल . हिच भावना !