सामाजिक

सहकारमहर्षी मा  आमदार स्व. दतात्रय वळसे पाटील यांच्या पुण्यतिथीनिमित्त विविध धार्मिक व सामाजिक कार्यक्रमांचे  आयोजन

Published

on

मंचर दि (प्रतिनिधी सहकारमहर्षी माजी आमदार स्व. दत्तात्रय गोविंदराव वळसे पाटील यांच्या २७ व्या पुण्यतिथीनिमित्त विविध समाजिक व धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून या कार्यक्रमानिमित्त सर्वांनी उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी असे आवाहन भीमाशंकर सहकारी कारखान्याचे अध्यक्ष बाळासाहेब बेंडे यांनी दिली.

प्रतीवर्षी प्रमाणे  सहकार महर्षी दत्तात्रय गोविंदराव वळसे पाटील यांच्या पुण्यतिथी निमित्ताने विविध धार्मिक सामाजिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत असतें याही वर्षी  मंगळवार (दि. १३ मे रोजी) २०२५ रोजी सायं. ६.०० वाजता  सहकारमहर्षी माजी आमदार स्व. दत्तात्रय गोविंदराव वळसे पाटील यांच्या स्मृती व स्फूर्तीदिन म्हणून साजरा करण्यात येत असून. त्या निमित्ताने ह.भ.प. बाळू महाराज गिरगावकर, गिरगाव बु., परभणी यांचे सुश्राव्य किर्तन त्याचा बरोबर भव्य शेतकरी मेळावा निरगुडसर येथील पंडित जवाहर लाल विद्यालयाच्या प्रारंगणामध्ये आयोजित केलेला आहे. तरी परिसरातील नागरिकांनी या कार्यक्रमास उपस्थित राहावे, असे आवाहन बेंडे यांनी केले आले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Trending

Exit mobile version