सामाजिक

“स्थानिक नेतृत्वाच्या मनमानी व अविश्वासाहर्य कारभाराने”, शिवसैनिकांचा “उबाटा” सेनेवरील हरविलेला विश्वास, खासदार संजय राऊत यांच्या दौऱ्याने परत मिळणार का….?

Published

on

मंचर दि. (प्रतिनिधी) राज्यामध्ये शिवसेनेत फूट पडून राजकीय स्थलांतरानंतर पोरक्या पडलेल्या ऊ बा टा सेनेच्या शिवसैनिकांच्या विश्वासाचे स्थानिक सक्षमनेतृत्वाने धिंदोडे उडवले असून सद्या उद्धव सेनेची अवस्था हि आत्मविश्वास हरवलेल्या एखाद्या मारतूकड्या पिंजाऱ्यातील  वाघाप्रमाणे झाली आहे. स्थानिक नेतृत्वाकडून वारंवार विश्वासघात झालेल्या शिवसेना ठाकरे गटाच्याकार्यकर्त्यांमध्ये खासदार संजय राऊत यांचे आंबेगाव, शिरूर,जुन्नर च्या दौऱ्याने  काही बदल घडणार का? हे पहाणे महत्वाचे ठरणार आहे

गेल्या काही वर्षापासून शिवसेना म्हणजे एक चविचा विषय झालेला आहे. ज्या शिवसेनाविषयी अनेक शिवसैनिक अना भाका खाऊन आपल्या घरावर तुळशीपत्र ठेवण्याची तयारी ठेवतअसत, त्याच शिवसेला आज गद्दारीची वाळावी लागली असून शिवसेना रुपी हा वटवृक्ष येथील स्थानिक अप्रामाणिक नेतृत्व व गद्दारीमुळे जुन्नर, आंबेगाव तालुक्यात तरी रसातळाला जात आहे असे म्हणणे अनेकांच्या मते वावगे ठरणार नाही.

https://bobhatanews.in/wp-content/uploads/2025/05/1000599394.mp4

दरम्यान जुन्नर आंबेगाव साठी शिवसेनेने दिलेल्या नेतृत्वावर साध्या शिवसैनिकांचाही विश्वास नाही त्यामुळे ज्यांनी शिवसेना रुपी हा वृक्ष जिवंत ठेवण्यासाठी व बहारण्यासाठी जीवाचे राण केले ते कट्टर शिवसैनिक आजही शिवसेनेच्या प्रवाहातून बाजूला गेले आहेत. हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी यांनी आंबेगाव तालुक्यात १९८४ साली “घोडेगाव” येथे पहिल्यांदा जाहीर सभा घेत  हिंदुत्व हेच राष्ट्रीयत्व हा नारा दिला होता. त्या शिवसेनेची आता गद्दारी वा अप्रामानिक पणाच्या कर्तृत्व शून्य पदाधिकाऱ्यांच्या स्वार्थी मनोदायामुळे वाटोळे झाले आहे. अशी प्रतिक्रिया सर्वसामान्य शिवसैनिकांनातून ऐकावयास मिळत आहे.

गेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये ज्यांनी जाहीर गद्दारी केली. कागदोपत्री खोटे अहवाल दाखवून वरिष्ठांची दिशाभूल करीत निवडणुकीत आपले हात ओले केले अशी कथाकथित नेतृत्व आज उजळ माथ्याने पक्षाच्या वरिष्ठ्यांचे मागे पुढे फिरत एकनिष्ठतेचा पाठ देत आहेत. म्हणतात ना… सो चुहे खाके… बिल्ली चली हज को…. या उक्ती प्रमाणे सध्या स्थिती आहे व या बाबत मुंबईतील सेना भवनात देखील  अनेकांनी  सांगून पाहिले व नेतृत्व बदलाची मागणी केली  परंतू येथे न्याय मिळण्या ऐवजी या कथाकथित पुढऱ्यांना निष्ठावंताची पखाल चढवून काही वरिष्ठ नेते त्यांची बाजू घेत आहेत मग यात नक्की काय? मर्म दडले आहे.हे जाणून घ्यायला कोणत्या चमकदार आरश्या ची गरज नक्कीच नाही.

 उद्धव ठाकरे सेनेत सध्या सर्वत्र  अशा काही तीन माकडाची उत्पत्ती झाली आहे कि, तेसर्व जाणूनही  डोळ्यावर, तोंडावर व कानावर हात ठेवून बसले आहेत. जसे तुम्ही काही केले आम्ही पाहिले नाही, तुम्ही काय? बोलले आम्ही ऐकले नाही, म्हणून आम्ही काही बोलत नाही अशी स्थिती झाली असल्याची चर्चा आहे. आज दुर्दैवाने सांगावेसे वाटते कि, जुन्नर आंबेगाव व शिरूर तालुक्यातील बेचाळीस गावांत शिवसेना (उद्धव सेना) कुठेही कार्यरत नाही. ज्या शाखा आहेत त्या फक्त कागदोपत्री आहेत. आलेल्या राऊत साहेबांनी खरोखरच गावोगावी जाऊन व्यवस्थित आढावा घेतला तर शिवसेनेची झालेली दैनिय अवस्था पाहवणार नाही. हे नक्की……

स्थानिक नेते फक्त वरिष्ठ आल्यानंतर त्यांना खुश करण्यासाठी कागदी घोडे नाचवत शिवसेनेच्या गाव तेथे शाखा व शाखा प्रमुख अस्तित्वात आहेत. कागदोपत्री खोटी वस्तुस्थिती मांडून वरिष्ठ नेत्यांना अंधारत ठेवत आहेत असे करून माजी मुख्यमंत्री  उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना कमकुवत ठेवण्यामागे येथील स्थानिक पक्ष  नेतृत्वाचा नक्की वैयक्तिक स्वार्थ आहे का? याची चौकशी होणे गरजेचे आहे.

दरम्यान सध्या स्थानिक नेतृत्वार विश्वास नसल्याने नाईलाजास्तव अनेक कार्यकर्ते शांत बसून आहेत. जुन्नर तालुकाप्रमुख माऊली खंडागळे यांनी खूप काही गमावून हि जुन्नर तालुक्यात शिवसेना जिवंत ठेवण्यासाठी कसोशीने प्रयत्न केला आहे. पुढील काळात जुन्नर आंबेगाव शिरूर  तालुक्याचे शिवसैनिक जागृत करून कार्यरत करण्यासाठी निस्वार्थी सक्षम नेतृत्व आंबेगाव जुन्नर व शिरूर तालुक्यास देण्यास खासदार संजय राऊत अयशस्वी ठरले तर  पुढील काळात या भागात सक्षम पक्ष बांधणी करणे शिवसेना उबाटा गटाला नक्कीच दुरास्पद होईल असे राजकीय वर्तुळातील जाणकारांचे मत आहे

1 Comment

  1. प्रा.अनिल नारायण निघोट

    May 24, 2025 at 3:25 pm

    तीस वर्ष ज्या शिवसेनेसाठी दिली,त्याच शिवसेनेचं अस्तित्व पुसण्याचं काम वरीष्ठ,संपर्किंच्या वशिल्यानं फक्त स्वतःपुरतं पहाणारे लादलेलं नेतृत्व ,ना विश्वासानं पहावं असं वाटतच नसल्याने गावागावात शिवसैनिक पहायला मिळणं पण अवघड झालंय कारण त्यांचाच द्वेष,विरोधकांशी सलगी, वर कित्येक तक्रारी पण केराची टोपली,निष्ठावंत शिवसैनिकांना किंमत ऊरली नाही, मिरवणारे राजकारण हाच धंदा करणारांना ऊद्धवजी पण मातोश्रीवर प्रवेश देऊन हे सांगतील त्यांला पदाधिकारी नेमतात,आधीच्यांचं काय झालं विचारायला नको का? वर शिवसैनिकांना अंधारात ठेवुन डायरेक्ट जाहीर पण नव्वद टक्के नेमणूका बाकी पण ज्यांचा द्वेष ते त्वरित बाजुला,जुन्नर, मावळ चे भाजप बंडखोर त्याच भाजपात मानानं मिरवतात पण ज्यांनी तीस वर्ष दिवसरात्र शिवसेनेचाच विचार करुन शेकडो मेळावे सभां,आधिवेशनांस ऊपस्थिती लावून बाळासाहेब ठाकरेंचे विचार जपत लाखो रुपये खर्चुन तालुकाभर कार्यक्रम उपक्रम घेत,सर्वांना मानाचं स्थान देत शिवसैनिक तितुका मेळवावा या भावनेनं कित््येक फ्लेक्स लावत गावोगावी शिवसेना फुटीनंतर ऊद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष विविध सामाजिक कार्यक्रमातुन पोहोचण्याचा प्रयत्न केला, ते आपल्याला काही पक्षकार्य करायचं नसलं तरी डोईजड होताहेत वाटल्यावर हस्तकांमार्फत तक्रारी करुन वशिल्यानं त्वरीत कारवाई !पण बेचाळीस गावातील तालुका स्तरीय माजी पदाधिकारी महाविकास आघाडीऐवजी वळसेंना पाठींबा देऊनही परत मानानं फ्लेक्स वर झळकतोय हे सोयीचं दुटप्पी धोरण फक्त शिवसेनेसाठी मनापासून जीवाचं रान करणारांना मात्र बाहेचा रस्ता,मग हकालपट्टीनंतर हे कधी शिवसेनेत घेतले? की पक्षनेत्रुत्वास संपर्कींच्या वशिल्यानं भुरळ घातली कोणास ठाऊक आधी एकानं भोळेभाबडे शिवसैनिक वापरुन घेतले,पैशाची चटकवाले त्यांच्याबरोबर बाजूला ऊडी मारुन गेले,आता तरी निष्ठावंत शिवसैनिकास किंमत येईल वाटलं तर पक्ष लक्ष च देत नसल्याने लोकसभा विधानसभा निवडणुकीत मलिदयाची चटक लागलेले वगळता, कुणाचे मिंधे न होणारे स्वाभिमानी शिवसैनिक पूर्ण थंडावलेत, प्रत्येक निवडणुकीत ज्यांचं काम केलं, ज्यासाठी राष्ट्रवादी च्या साम दाम दंड भेदाचा सामना करुन वाईटपणा घेऊन भविष्याची रोजीरोटीची धुळदान करुन घेतली,त्यांच्याच चटया ऊचलायची वेळ शिवसैनिकांवर ऊद्धवजींनी आणली, आताही गावागावात शिवसैनिक कुठंय दुर्बिण घेऊन सापडत नाही, ऐंशी टक्के राष्ट्रवादी च्या दोन्ही गटांनी गुंडाळलेत,कोण कुठं तेच कळत नाही,कसली निष्ठा न कसलं काय ? निष्ठावंतांवर ईतर ठिकाणी जाण्याची वेळ आणली पण त्यातुन भगवा सोडणार नाही म्हणारांची गोची झाली,या हाडाच्दाया शिवसैनिकांना काही पोटासाठी ,घरं भरण्यासाठी शिवसनेत नाही,तर त्यांना शिवसेनेचं बाळकडु आहे
    पद शिवसेनेचे पण काम राष्ट्रवादीचं,निवडणूका पार पडुन शेकडो दिवस झाले,ना मिटिंग ना आंदोलन ना कार्यक्रम आता कुठं जाग आलीय,पण विरोधकांच्या पाकीटांसाठी शिवसेना दावणीला,कायम विरोधकांचं हित मग शिवसैनिकांचा विश्वास च संपला,चार दहा वशिल्यानं निवडलेले पदाधिकारी म्हणजे शिवसेना?

Leave a Reply

Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Trending

Exit mobile version