सामाजिक
जांभोरी येथील “हनुमान तरुण मंडळाकडून” दहावी, बारावी परीक्षेत यशस्वी विद्यार्थ्यांचा सत्कार
डिंभे दि. (प्रतिनिधी)-जांभोरी गावात दहावी व बारावी परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा येथील हनुमान सामाज विकास तरुण मंडळ व जांभोरी ग्रामस्थांचे वतीने सत्कार करण्यात आला
आंबेगाव तालुक्याच्या आदिवासी पश्चिम दुर्गम भागातील भीमाशंकर खोऱ्यामध्ये वसलेल्या जांभोरी गावच्या इयत्ता दहावी बारावी परीक्षामध्ये उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा येथील हनुमान समाज मंडळाकडून गावाच्या वतीने सत्कार करण्यात आला मंडळाचे वतीने सर्व यशस्वी विदयार्थ्यांना आकर्षक ट्रॉफी वह्या पेन वाटप करून त्यांचा सन्मान करण्यात आला.
जांभोरी येथील हनुमान समाज विकास तरूण मंडळ जांभोरी गावठाण दरवर्षी विविध कला क्रीडा सामाजिक शौक्षणिक क्षेत्रातील विद्यार्थ्यांच्या उत्कर्षासाठी उपक्रम राबाविते अशी माहिती येथील सामाजिक कार्यकर्ते मारुती केंगले यांनी दिली.
दरम्यान यावर्षी इयत्ता दहावी वा बारावी परीक्षामध्ये यशस्वी विद्यार्थी पुढील प्रमाणे.. वैष्णवी सखाराम केंगले.(बारावी), आयुष रमेश केंगले. (दहावी) आर्यन गणेश बांबळे. (दहावी). वेदांत भिकाजी केंगले (दहावी), रोहन संतोष केंगले (दहावी), प्रथमेश प्रकाश धादवड (दहावी), तसेच पहिली ते दहावीच्या मुलांना वही पेन आकर्षक ट्रॉफी साहित्य वाटप करण्यात आले
या प्रसंगी हनुमान सामाज विकास तरूण मंडळाचे अध्यक्ष राजेंद्र मेचकर सचिव बाळु केंगले, खजिनदार सखाराम केंगले, डी. वाय. एस. पी राहुल केंगले आणि कार्यक्रमाचे अध्यक्ष निर्मला संजय केंगले शांताराम केंगले राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पश्चिम विभागाचे युवानेते मारुती दादा केंगले हरीभाऊ केंगले प्रकाश केंगले सागर काठे लक्ष्मण केंगले दुंदा केंगले बबन केंगले पेसा उपाध्यक्ष जांभोरी मिनाबाई केंगले ग्रामपंचायत सदस्य जांभोरी लताबाई केंगले, गजानन काठे आणि जांभोरी गावचे ग्रामस्थ उपस्थित होते युवानेते मारुती दादा केंगले यांनी इयत्ता दहावी आणि बारावीच्या मुलांना पुढील शिक्षणासाठी हार्दिक शुभेच्छा दिल्या सूत्रसंचालन शांताराम केंगले यांनी केले प्रास्ताविक सखाराम केंगले आणि राजेंद्र मेचकर यांनी केले आभार बाळू केंगले यांनी मानले