सामाजिक

केवळ नफा कामविणे हे उदीष्ट्य डोळ्यासमोर न ठेवता, “सर्वांनां मदत करत सक्षम करण्यासाठी प्रयत्न करणे हि महत्वाचे”  – देवेंद्रशेठ शाह

Published

on

मंचर दि. (प्रतिनिधी )- बदलत्या काळात नवं तंत्रज्ञान व विकसित प्रणाली आपण स्वीकारली नाही तर आपण काळाच्या मागे पडू, स्पर्धेच्या युगात बळकट राहण्यासाठी  शरद बँके हि नवं प्रणालीची कास धरत  विविध सेवा ग्राहकांसाठी उपलब्ध कायेंऊं देत, आपल्यावर विश्वास ठेवून सोबत येणाऱ्यांना सक्षम करण्यासाठी मदत करणं हि गरजेचं आहे. असे प्रतिपादन शरद बँकेचे अध्यक्ष देवेंद्र शाह यांनी केले.

दरम्यान विकसित प्रणालीचा अवलंब करीत शरद सहकारी बँकेच्या वतीने क्यू आर कोडं प्रणालीची सुविधा ग्राहकांसाठी सुरु करण्यात आली यावेळी मंचर येथे  पराग फूड्स लिमिटेड या कंपनीच्या आवारात असलेल्या टुरिझम हॉल मध्ये  झालेल्या कार्यक्रमात ते बोलत होते या वेळी बोलताना शाह पुढे म्हणाले कि, नवं बँकिंग आपण स्वीकारले नाही तर असणाऱ्या स्पर्धेत आपण पुढे जाऊ शकणार नाही. विविध काही अडचणी मात करीत आज बँकेने यावर्षी आपला एन पी ए हा शुन्य टक्क्यावर आणला. परंतू एव्हडे करून चालणार नाही तर आपल्या आजूबाजूला असणाऱ्या सर्व स्पर्धावर मात करीत आपले ध्येय साध्य करण्यासाठी आपणाला एकत्रित काम कारावे लागेल. बँकेत येणाऱ्या ग्राहकाला आपणांकडून इतर बँकाच्या तुलनेत चांगली सेवा ग्राहकांना उपलब्ध करून दयावी लागेल. त्यासाठी बँकेच्या संचालक मंडळाचा हा निर्णय आहे कि, बँकेचा यथोचित उत्कर्ष साधण्यासाठी योग्य वाटचाल करणार आहोत 

आपले मत व्यक्त करताना शाह पुढे म्हणाले कि, आज बँकेकडे सुमारे १९००/- कोटी रुपयांच्या ठेवी आहेत.सुमारे ३४oo/-कोटी रुपये व्यवसाय आहे. तर सुमारे तीस हजार सभासद तर तेरा हजार ठेवीदार आहेत.ग्राहकांच्या सेवेसाठी सध्या २७शाखा कार्यरत असून  या चालू आर्थिक  वर्षात आणखी तीन शाखा सुरु करणार असल्याचे शाह यांनी सांगितले. ये पुढे म्हणाले कि बँकिंग पेक्षा खूप काही हा माणस डोळ्यासमोर ठेवून आपल्या बँकेचे सभासद ठेवीदार कर्जदार सर्वाना उत्कृष्ठ सुविधा देत त्यांची प्रगती कशी होईल याचा विचार डोळ्यासमोर ठेवून काम करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

यावेळी बँकेचे उपाध्यक्ष विवेक वळसे पाटील, मुख्यकार्यकारी अधिकारी राजेंद्र देशमुख, संचालक दत्ताशेठ थोरात, सोमनाथ काळे, दिलीप काळे, शिवाजी लोंढे,पांडुरंग पवार,अशोक आदक, किसन सैद,सुदाम काळे जयसिंग थोरात, संतोष धुमाळ प्रदीप आमुंडकर,मारुती लोहकरे, सौ रुपालीताई झोडगे, सौ सुषमाताई शिंदे, अजय घुले, अँड संजय आर्वीकर, विजय कुमार शिंदे सेवक प्रतिनिधी अजित देवकर, अभय आवटे आदी मान्यवर उपस्थित होते 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Trending

Exit mobile version