सामाजिक

“स्थलांतर नव्हे, सुरक्षित पुनर्वसन हवे!… आंबेगाव तालुक्यातील आदिवासी भागातील गावकर्यांची मागणी

Published

on

मंचर दि. (प्रतिनिधी)-आंबेगाव तालुक्याच्या पश्चिम आदिवासी दुर्गम भागातील विविध गावांमध्ये  जमीन उत्सखननाच्या घटना घडण्याची शक्यता आहे त्यामुळे या विविध गावावर माळीण सारखी विपत्ती येऊ नये या साठी येथील नागरिकांनी सुरक्षित पुंर्वसन करण्याची माजी मंत्री दिलीप वळसे पाटील यांच्याकडे केली आहे.

आंबेगाव तालुक्याच्या पश्चिम  आदिवासी दुर्गम भागात असलेल्या माळीण गाव २०१४मध्ये पूर्णपणे काळाच्या पादाद्याआड गेला. हि मानवी मन सुन्न करणारी हृद्यद्रावक घटना घडून यात सुमारे १५१ जण मातीत गाडले गेले होते आजही प्रत्येक व्यक्तीच्या मनावर हि घटना भळ भळत्या जखमे प्रमाणे ताजी आहे. प्रचंड पावसात भयावह काळाच्या विक्रांळ जबड्यात या व्यक्ती समावून गेल्या या विषयी दुःख व्यक्त करण्यापलीकडे कुणाच्या हाती काहीच उरले नाही अनेकांनी मदतीचे हात पुढे केले पण झालेली हानी मात्र भरून येऊ शकत नाही.

अशा प्रकारची घटनांची नव्याने पुन्हापुनरावृत्ती घडू नये यासाठी प्रत्येकाने खबरदारी घेऊन आपली जबादारी ओळखून प्रमाणिक पणे काम केल्यास भविष्यातील असे धोके टाळता येऊ शकतात हे निश्चित  आजही आंबेगाव तालुक्यात काही या गावे अतिसंवेदनशील असलेल्या गावांमध्ये खबरदारीचा उपाय उपाय योजना करणे गरजेचे आहे.म्हणून मंचर येथे सामाजिक कार्यकर्त्यां पूर्वा वळसे यांच्या सोबत गावकर्यांनी घेतलेल्या बैठकीदारम्यान माळीण, पसारवाडी, पोखरी, जांभोरी, फुलवडे, मेघोली यांसारख्या अतिसंवेदन शील गावांत उपाययोजना करण्यासाठी तसेच आंबेगाव तालुक्याच्या पश्चिम टोकावर आणि ठाणे जिल्ह्याला लागून असलेल्या साखरमाची गावाच्या पुनर्वसनासाठीही त्वरित कारवाही करण्यासाठी व धोकादायक घरांतील नागरिकांना तात्काळ सुरक्षित ठिकाणी हलवून त्यांची धान्य व निवाऱ्याची व्यवस्था करण्याचे अवाहन पूर्वा वळसे यांनी घेतलेल्या मिटिंगमध्ये प्रशासनाला केले..

त्याचप्रमाणे”साखरमाची” पुनर्वसनासाठी लवकरच उपमुख्यमंत्री, महसूलमंत्री, वनमंत्री, पुणे व ठाणे जिल्हाधिकारी तसेच संबंधित विभागांच्या प्रमुख अधिकाऱ्यांसमवेत मुंबई येथे बैठक घेतली जाणार असून, हा प्रश्न प्राधान्याने सोडवला जाईल, असे आश्वासन पूर्वा वळसे पाटील यांनी ग्रामस्थांना दिलेयावेळी समाज कल्याणचे माजी सभापती सुभाष मोरमारे, उपसभापती संजय गवारी, प्रवीण पारधी, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पश्चिम विभागाचे युवानेते मारुती दादा केंगले जांभोरी गावच्या सरपंच सुनंदाताई पारधी उपसरपंच बबन केंगले किसन पारधी काळ्वाडी ग्रामस्थ यांची मागणी आहे लवकरात लवकर आदिवासी भागातील गावाचं पुनर्वसन शासनाने लवकरात लवकर करावा हि आदिवासी बांधवांची मागणी आहे सविता कोकाटे, आहुपेचे माजी सरपंच रमेश लोहकरे, शंकर लांघी, संजय असवले व इतर ग्रामस्थ उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Trending

Exit mobile version