सामाजिक
“बी एस एन एल” ने अनेक महिन्यांपासून मोबाईल टॉवर उभारूनही रेंज नसल्याने नागरिकांतून तीव्र संताप व्यक्त
भीमाशंकर दि. (प्रतिनिधी) अनेक महिन्यापूर्वी टॉवर उभा करून यंत्रणा बसवूनही बी. एस. एन. एल.ची मोबाईल सुविधा अद्यापही बंदच असल्याने आंबेगाव तालुक्याच्या आदिवासी भागातील नागरिकांची मोठी हेडसाळ होत असून कंपनीने त्वरित मोबाईल सुविधा न पुरविल्यास तीव्र आंदोलन करण्याचा ईशारा ग्रामस्थांनी दिला आहे.
दरम्यान दूरध्वनी क्षेत्रात बी. एस.एन. एल. म्हणजे झोपेचे सोंग घेतलेला “बिग बुल” आहे असे म्हंटले जाते. याने जागे होऊन थोडी हालचाल जरी केली तरी खाजगी मोबाईल कंपण्या मोडकळीस येतील एव्हढी भारतीय दुरसंचार निगमची ताकत आहे.कारण बी एस एन एल चे भारताच्या कानकोपऱ्यात मोठ्या प्रमाणावर सक्षम नेटवर्क सुरु कारण्यासाठीचे स्वतः ची ताकत आहे परंतू असे म्हटले जाते कि, कथाकथित राजकीय हस्तक्षेप व खाजगी कंपन्यांकडून या कंपनीतील अधिकाऱ्यांनाची होणारी उठाठेव पहाता स्वतः चे सर्वात सक्षम नेटवर्क असूनही हि कंपनी ग्राहकांना योग्य सुविधा देऊ शकत नाही हे सत्य नाकारता येत नाही
दरम्यान खाजगी कंपन्या आपले नेटवर्क ग्राहकांनी वापरावे म्हणून बी एस एन एल च्या कथाकथित मॅनेजमेंट व अधिकारी यांना मोठा मलाईचा खाऊ देत असल्याची चर्चा अनेक वर्षापासून आहे परंतू या निबरगठ्ठ झालेल्या अधिकारी व संबंधित मॅनेजमेंट याचा काहीच फरक पडत नाही. त्यामुळे आजही सर्वत्र बी. एस. एन.एल. चे मनोरे अनेक ठिकाणी उभे राहुनही त्यांना योग्य सेवा सक्षमता असूनही हि कंपनी देऊ शकत नाहीवास्तविक पहाता हा सर्व येथील मॅनेजमेंटच्या नाकर्तेपणाचा भाग असल्याचे सांगितले जाते.
दरम्यान आंबेगाव तालुक्यात आदिवासी भागात असलेल्या जांभोरी बांबळेवाडी या ठिकाणी बी. एस. एन. एलचा मनोरा टॉवर उभारून एक वर्ष पूर्ण झाले आहे. तरीसुद्धा अद्यापहि कंपनीकडून याभागात रेंज चालु करण्यात आली नाही माजी सहकारमंत्री नामदार दिलीपराव वळसे पाटील साहेब यांनी मुंबई या ठिकाणी बी एस एन एल आधिकारी यांच्यासोबत मीटिंग घेऊन आदिवासी ग्रामीण भागात कोट्यवधी रुपये खर्च करुन जांभोरी कुशीरे फुलवडे तळेघर माळीण राजेवाडी अशा बऱ्याच गावात बी एस एन एलचे मनोरे टॉवर उभारुन जांभोरी बांबळेवाडी या ठिकाणी एक वर्ष झाल टॉवरला कलर देऊन डी. पी. सोलर सिस्टीम करून सगळं तयार आहे परंतू रेंज सोडण्याच्या प्रतीक्षेत आहे. या भागाचे खासदार मात्र अजूनही याबाबत कोणतेच पाऊल उचलण्यास सक्षम ठरलेले नाही
दरम्यान राष्ट्रवादी काँगेस पक्षाचे पश्चिम विभागाचे युवानेते प्रविण पारधी दिनेश गभाले युवानेते मारुती केंगले.बबन केंगले अविनाश पारधी शिवराम केंगले जांभोरी गावच्या सरपंच सुनंदाताई पारधी उपसरपंच बबन केंगले खरेदी विक्री संघाचे संचालक शामराव बांबळे संजय दादा केंगले माजी सरपंच सखुबाई केंगले पोलीस पाटील नवनाथ केंगले दिगंबर दत्तात्रय केंगले अरुण केंगले प्रकाश केंगले गणेश केंगले विजय सुपे युवराज बांबळे आदिंनी आंदोलनाचा ईशारा दिला आहे.