सामाजिक
जांभोरी येथील”ग्रामविकास प्रतिष्ठान” तर्फे आदिवासी विद्यार्थांना शैक्षणिक साहित्याचे वाटप “
घोडेगाव दि (प्रतिनिधी)आंबेगाव तालुक्याच्या आदिवासी पश्चिम भागात भीमाशंकर खोऱ्यात असलेल्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळेस ग्रामविकास प्रतिष्ठान या संस्थेच्या वतीने शौक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले.
तालुक्याच्या पश्चिम आदिवासी भागात कला क्रीडा शौक्षणिक व सामाजिक क्षेत्रात कार्यरत असलेल्या जांभोरी येथील ग्रामविकास प्रतिष्ठान या संस्थेच्या वतीने दरवर्षी विविध सामाजिक कार्यक्रम राबविले जातात यात रक्तदान शिबीर, वैद्यकीय शिबीर शौक्षणिक साहित्य वाटप, शालेय गणवेश वाटप, गरीब होतकरू हुशार विद्यार्थ्यांसाठी विविध प्रकारे शौक्षणिक मदत केली जाते
त्याचप्रमाणे शाळा नांदूरकीचीवाडी येथील प्राथमिक शाळेतील सर्व विद्यार्थांना, दप्तर, वह्या , ,पेन पेन्शल,तसेच माध्यमिक शाळेतील 8 वी ते 10 च्या विद्यार्थांना वह्या पुस्तक कंपासव दप्तरांचे वाटप करण्यातआले त्याचप्रमाणे, इयत्ता 10 व 12 वी परीक्षेत यशस्वी विद्यार्थांचा गुणगौरव करण्यात आला.
दरम्यान जांभोरी परिसरातील सर्व शाळेतील विद्यार्थ्यांना या शौक्षणिक वर्षांपासुन अभ्यासक्रमावर अधारीत इंग्रजी, गणित, तसेच स्पर्धा परीक्षा तयारी यासाठी जिल्हा परिषद यांच्या परवांगीने विद्यार्थी गुणवता कार्यक्रम हाती घेऊन यात “माझा गुणवता धारक वर्ग”व “माझे शिक्षक” उपक्रमांतर्गत, विदयार्थांना व शिक्षकांना प्रमाणपत्र व भव्य बक्षीस देऊन गौरविण्यात येणार असल्याचे संस्थेचे अध्यक्ष अंकुश केंगले यांनी आपले मनोगत व्यक्त करताना सांगितले
कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी राजेंद्र बेंद्रे (हिंदू युवा प्रबोधिनी )यांनी भूषविले, तर प्रमुख पाव्हणे, गणेशजी वाघ उद्योजक, वैभव मोगरेकर (रोस्ट्रम इंडिया सोशल संस्था), किरण फरांदे(सामाजिक कार्यकर्ते) राज केंगले (एच आर कंट्रक्षण)चंद्रकांत लोहकरे (API) गणेश देसले (उद्योजक)सर्जेराव पडवळ (उद्योजक) यांनी देणगी रूपाने सहकार्य केले.
यावेळी जांभोरी चे उपसरपंच बबन केंगले, माजी उपसरपंच विलास केंगले, शाळेचे मुख्याध्यापक संजय केंगले, सहशिक्षक सतीश सांगडे,बिरसा ब्रिगेड अध्यक्ष सुनिल गिरंगे, राष्ट्रवादी काँगेस पक्षाचे पश्चिम विभागाचे युवानेते मारुती दादा केंगले पांडुरंग केंगले माजी तंटामुक्ती अध्यक्ष , पोलिस पाटील नवनाथ केंगले भीमा केंगले, किसन लोहकरे,शांताराम लोहकरे पुष्पा केंगले, सुनीता भवारी, उषा केंगले चिमाजी गिरंगे, सूर्यकांत केंगले गुरुजी, वसंत केंगले, आदी मान्यवर उपास्थित होते.कार्यक्रमाचे प्रस्ताविक किसन गिरंगे व सूत्रसंचालन अंकुश गिरंगे यांनी केले तर आभार अंकुश केंगले यानी केले.