सामाजिक
“जिल्हाप्रमुखाकडून” सहकार्य होत नसल्याचे सांगत तालुका प्रमुख दत्ता गांजाळे यांनी दिला पदाचा राजिनामा:,तर शिंदे गटात प्रवेशाची चर्चा
मंचर दि (प्रतिनिधी ) आंबेगाव तालुक्यात शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाला मोठा धक्का बसला आहे. जिल्हाप्रमुख यांच्याकडून सहकार्य होत नाही असे कारण सांगत दत्ता गांजाळे यांनी राम राम ठोकत तालुका प्रमुख पदाचा राजिनामा दिला असून शिवसेना शिंदे गटात प्रवेश करणार असल्याची चर्चा आहे.
महाराष्ट्रामध्ये गेल्या दोन वर्षापूर्वी शिवसेनेत मोठी पडझड असताना मात्र आद्यापही उद्धव ठाकरेना संघटना सावरण्याचा सुरु गावसलेला दिसत नाही. त्यामुळे गेली काही महिन्यापासुन कुठेना कुठेतरी शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचा शिलेदार पक्ष सोडून शिंदे गटात प्रवेश करीत आहे.त्यामुळे खरचंच मातोश्रीचे लक्ष नक्की कोठे? आहे हेच कळत नाही. आंबेगाव तालुक्यात शिवसेनेचे दिवंगत नेते अविनाश रहाणे यांच्या निधनानंतर आंबेगाव तालुक्यात शिवसेनेची मोठी वाताहत होत चालली असल्याचे पहावायास मिळत आहे.
दरम्यान गेल्या महिन्यामध्ये शिवसेना उबाटा पक्षाचे नेते खासदार संजय राऊत यांचा नुकताच दौरा झाला. या दौऱ्यानंतर उबाटा सेनेत काहीतरी सकारात्मक बदल होतील अशी शिवसैनिकांना अपेक्षा होती.कारण याच दौऱ्यादरम्यान झालेल्या शिवसैनिकांच्या मेळाव्या मध्ये जिल्हा प्रमुख यांनी पंधरा दिवसांत संघटनेची मजबूत बांधणी करण्याचे आश्वासन दिले होते. परंतू त्या अश्वासणाचा जणू चुराडा झाला असल्याचे दिसत आहे. कारण संघटना बांधणी दूरच दस्तूर खुद तालुका प्रमुख दत्ता गांजाळे यांनी जिल्हा प्रमुख मदत करत नसल्याचे कारण कारण सांगत पक्षाला जय महाराष्ट केला आहे. परंतू ते आपल्या कार्यकर्त्यासोबत शिंदे गटात प्रवेश करणार असल्याची चर्चा सुरु आहे. याबाबत तालुका प्रमुख गांजाळे यांनी मी पक्षाशी एकनिष्ठ असून शिवसैनिक म्हणून काम करणार असल्याचे गांजाळे यांनी सांगितले. तसेच जिल्हा प्रमुख यांच्याशी संपर्क साधन्याचा प्रयत्न केला असता त्यांचा संपर्क होऊ शकला नाही
दरम्यान शिवसेना शिंदे गटातील काही तालुका पातळीवरील नेत्यांचा हि गांजाळे यांच्या प्रवेशावर विरोध असल्याचे समजते त्यामुळे गांजाळे यांची शिंदे गटातील नेत्यांसोबत काही अंतर्गत डिल (चर्चा) सुरु असून त्यावर अंतिम शिक्कामोर्तब होणे बाकी असल्याचीही चर्चा सुरु आहे.एकंदरीत उत्तर पुणे जिल्ह्यात उद्धव ठाकरे सेनेकडे आंबेगाव तालुक्यात सक्षम नेतृत्व नाही. त्यामुळे तालुक्यात पक्षीय पदाधिकाऱ्यांमध्ये सुदोपसुंदी सुरु असून त्याचे परिणाम पक्ष वाढी वर होत असल्याचे दिसत आहे. त्यामुळे पुढील काळात सर्व कार्यकारणी बरखास्त करून नव्याने जिल्हाकार्यकारणीपासुन नेमणूका करण्याची आवश्यकता असल्याचे जाणकारांनाचे मत आहे.
दरम्यान सध्याचे जिल्हा प्रमुख यांच्यावर मात्र विश्वास ठेवून काम करण्यास कोणीही तयार नाही. तालुक्यात उ.बा.टा. सेनेकडे निष्ठावंत शिवसैनिकांची संख्या मोठी आहे परंतू संघटनेकडे जिल्हा पातळीवर अथवा तालुका पातळीवर विश्वासाहर्य नेतृत्व नसल्यामुळे शिवसैनिकहि स्तब्ध आहे. या
प्रा.अनिल निघोट
June 27, 2025 at 1:28 pm
आतातरी ऊद्धवजींनी कुणालाही नीट काम करु न देणारे, सर्व शिवसेना आघाडयांत ढवळाढवळ करून प्रत्येक आघाडी पदाधिकारी निवडीत वशिल्याने नेमणूकांसाठी संबंधित आघाडीप्रमुखांस , शिवसैनिकांस विश्वासात न घेणारे ,जवळचे पण तालुक्यात न रहाणारांनाही कोणत्या ना कोणत्या आघाडीत पैसेवाला पाहुन पद देणारांना ऊद्धवजी बदला , हजारो शिवसैनिक मुंग्यांच्या वारुळाप्रमाणे बाहेर पडुन विरोधकांना बाळासाहेबांच्या आक्रमकतेने आव्हान देतील ,नाहीतर शिवसेना दिवसेंदिवस बिनकामी पदाधिकारींमुळं अजून च क्षीण होताना पहाण्याचं , ज्यांनी आवाज कुणाचा शिवसेनेचा या गगनभेदी घोषणा दिल्या, राष्ट्रवादीच्या विरोधकांना मुहतोड जवाब दिला .त्यांच्या नशिबी राष्ट्रवादीच्याच चटया ऊचलायची वेळ येईल.