सामाजिक
पारगाव चे महसूल कार्यालय मोजतोय अखेरच्या घटका
मंचर दि. (प्रतिनिधी )-आंबेगाव च्या पूर्व भागातील पारगाव कारखाना येथील तलाठी व महसूल मंडलाधिकारी कार्यालय शेवटच्या घटका मोजत आहे. दोन्ही कार्यालयाची इमारत नादुरुस्त झाल्याने पारगाव जारकरवाडी तलाठी कार्यालय पारगाव ग्रामपंचायत खोलीमध्ये चालू आहे
आंबेगाव तालुक्याच्या पूर्व भागात असलेले महसूल मंडलाधिकारी कार्यालय खाजगी जागेत चालू आहे. पूर्वीची इमारत चाळीस वर्षाहून अधिक झाली आहे. सदर इमारत जीर्ण स्वरूपाची झाली असून कौलारु इमारत आहे. या इमारतीला तडे गेले असून धोकादायक बनली आहे . याबाबत आंबेगावचे तहसीलदार संजय नागटिळक यांच्याकडे संपर्क साधला असता त्यांनी याबाबत माहिती घेऊन कळवू असे सांगितले.
तलाठी सजेसाठी पारगाव जारकरवाडी ही गावे असून महसूल मंडलाधिकारी कार्यालयसाठी एकुण सतरा गावे आहेत त्यामध्ये पारगाव, जारकरवाडी, शिंगवे, वळती, भागडी, काठापूर बुद्रुक, लाखणगाव, पोंदेवाडी, धामणी, पहाडदरा, शिरदाळे, लोणी, वडगावपीर, मांदळेवाडी, खडकवाडी, रानमळा, वाळुंज नगर. ही गावे येत असल्याचे माहिती मिळत आहे. सदर इमारतीचे काम तात्काळ मार्गी लावावे अशी मागणी पोंदेवाडीचे माजी सरपंच अनिल वाळुंज व जारकरवाडीचे उपसरपंच सचिन टाव्हरे यांनी केली आहे.