सामाजिक
आंबेगाव तालुका शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाच्या तालुका प्रमुख पदी “नितीन भालेराव”
मंचर दि. (प्रतिनिधी )- शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या आंबेगाव तालुका प्रमुख पदी नितीन भालेराव यांची निवड करण्यात आली आहे
आंबेगाव तालुक्यात शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचे तालुका प्रमुख दत्ता गांजाळे यांनी आपल्या पदाचा राजिनामा देत शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला या नंतर शिवसेनेचे उपतालुका प्रमुख व कळंब गावाचे ग्रामपंचायत सदस्य नितीन भालेराव यांची तालुका प्रमुख पदी निवड करण्यात आले असल्याचे शिवसेनेच्या मुखपत्र असलेल्या दैनिकात प्रसिद्ध करण्यात आले आहे
आंबेगाव पंचायत समितीचे माजी सभापती कै. वसंतराव भालेराव यांचा हात पकडून राजकारणात प्रवेश करणारे तालुका प्रमुख नितीन भालेराव यांच्या पत्नी यांनी देखील कळंब गावचे सरपंच पद भूषविले आहे. पुढील काळात होणाऱ्या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या दृष्टीने आंबेगाव तालुक्यातील कळंब गटामध्ये भालेराव यांच्या नावाची चर्चा सुरु आहे.
दरम्यात आंबेगाव तालुक्यात उबाटा पक्षाची बांधणी अद्यापगी झालेली नाही.अनेक शिवसैनिक पक्षात असून हि शांत आहेत तर काहींनी नाईलाजास्तव शिंदे गटाचा मार्ग अवलंबला आहे त्यामुळे नवीन तालुका प्रमुखांनाव संघटना बांधणीची मुख्य जबाबदारी भालेराव यांच्यावर आहे.
दरम्यान तालुक्यातील शिवसैनिकाना पुढील काळात विश्वासात घेऊन विखूरलेली शिवसेना बांधणी करण्याची मोलाची जबाबदारी नवनिर्वाचित तालुका प्रमुख यांच्यावर आगामी काळात असून ती जबाबदारी पूर्ण करण्यात किती यशस्वी ठरतात? हे पुढील काळात दिसून येईलच.