सामाजिक
पोखरी येथील वनविभागाचे वतीने “हिरडा महोत्सव “उत्साहात साजरा :”भीमाशंकर परिसरात दहा हजार झाडे लावण्याचे लक्ष”…
घोडेगाव दि (नवनाथ फलके)आंबेगाव तालुक्याच्या पश्चिम आदिवासी भागातील पोखरी येथील “श्री पंढरीनाथ महाविद्यालयात “हिरडा महोत्सव” या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले याप्रसंगी आदिवासी भागात यावर्षी दहा हजार वृक्ष लागवड करण्याचे लक्ष ठेवण्यात आले आहे
जुन्नर वनविभागाअंतर्गत घोडेगाव वनपरिक्षेत्राच्या वतीन पेसा क्षेत्रातील दहा हजारांहून अधिक झाडाची रोपे आदिवासी शेतकऱ्यांना मोफत देण्यात आली,यात हिराड्या सोबत बांबू,काजू, जांभूळ, साग आदी झाडांची रोपे देखील वाटण्यात आली. आगामी काळात भीमाशंकर अभयारण्य परिसरात पर्यावरण संवर्धन, शाश्वत शेती आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेच्या सशक्तीकरणाच्या दिशेने हे अत्यंत महत्वाचे पाऊल समजले जात आहे
या कार्यक्रमाचे प्रसंगी आपले मनोगत व्यक्त करताना माजी मंत्री दिलीप वळसे पाटील म्हणाले कि , निसर्गातील बदलांमुळे शेतकऱ्यांवर दरवर्षी वेगवेगळ्या संकटांचा सामना करावा लागतो. त्यामुळे पारंपरिक व पर्यावरणपूरक उत्पन्न स्रोतांकडे वळणे गरजेचे आहे. हिरडा, स्टॉबेरी, यासारख्या वनउपजांच्या लागवडीकडे शेतकऱ्यांनी विशेष लक्ष द्यावं, जेणेकरून कमी जोखमीच्या मार्गातून अधिक उत्पन्न मिळवता येईल. याआधी हिरड्याच्या नुकसानीबद्दल १४ कोटींची नुकसानभरपाई देण्यात आली होती, हे समाधानकारक आहे. वनउपज वस्तू विक्रीसाठी लागणाऱ्या परवानगी सुलभ करण्यासाठी वनविभागाने स्वतंत्र यंत्रणा राबावावी, जेणेकरून दलालांचा हस्तक्षेप न होता थेट शेतकऱ्यांच्या हातात मोबदला पोहोचू शकेल,
त्याचप्रमाणे या उपक्रमामुळे वन्यप्राणी-मानव संघर्ष कमी करण्यास मदत होईलच, पण त्याचबरोबर गावांच्या विकासाला एक नवा पर्यावरणपूरक दृष्टिकोन मिळेल. वनविभागाच्या सहकार्याने आणि स्थानिक लोकसहभागातून अशा उपक्रमांचा विस्तार करणे ही काळाची गरज आहे. ‘हिरडा महोत्सव हा फक्त रोपे वाटपाचा कार्यक्रम नसून, तो ग्रामीण समृद्धीकडे नेणाऱ्या बदलाची सुरुवात आहे,
दरम्यान या कार्यक्रमास आदिवासी भागातील कोंढवळ, राजापूर, तळेघर, जांभोरी, चिखली, पोखरी, राजेवाडी, गोहे, उगलेवाडी, चपटेवाडी, फुलावडे, बोरघर, अडीवरे, तिरपाड आदी गावाचे सरपंच ग्रामपंचायत सदस्य ग्रामसेवक आदी मान्यवर उपस्थित होते. या कार्यक्रमास उपवनसंरक्षक प्रशांत खाडे, अमोल सातपुते, प्रकल्प अधिकारी प्रदिप देसाई, सहायक उपवनसंरक्षक अमृत शिंदे, वनपरिक्षेत्र अधिकारी कुणाल लिमकर, विकास भोसले तसेच समाज कल्याणचे माजी सभापती सुभाष मोरमारे, संजय गवारी, विष्णुकाका हिंगे, प्रकाश घोलप, निलेश थोरात, प्रविण पारधी, जनाबाई उगले, इंदुबाई लोहकरे, नंदकुमार सोनावळे,राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पश्चिम विभागाचे युवानेते मारुती दादा केंगले ग्रामसेवक सुनिल पारधी निलेश बो-हाडे, बाळासाहेब कोळप, अमोल अंकुश, गौतम खरात, सलिम तांबोळी, अशोक गभाले, बुधाजी डामसे, प्राचार्य शशिकांत साळवे, सहायक पोलिस निरीक्षक सागर पवार , गटविकास अधिकारी अर्चना कोल्हे व इतर ग्रामस्थ आणि आदिवासी बांधव उपस्थित होते.