सामाजिक
“इमारत पहाता दिसतोय विकास,…मात्र सुविधा मिळताहेत एकदम बकवास”… मंचरच्या उपजिल्हा रुग्णालायाची दैनीय अवस्था
मंचर दि (प्रतिनिधी ) येथील उपजिल्हा रुग्णालयात रुग्णांना सुरळीत सुविधा द्या अन्यथा येणाऱ्या पंधरा दिवसांत तीव्र आंदोलन करण्याचा ईशारा आम आदमी पक्षाचे सालिम इनामदार यांनी लेखी निवेदना द्वारे दिला आहे.
आंबेगाव तालुका म्हणजे पुणे जिल्ह्यात बारामतीनंतर विकसित तालुका अशीच काहीशी चर्चाच काही कथाकथित पक्षाचे कार्यकर्ते करताना दिसतात परंतू विकास हा फक्त बांधलेल्या इमारतीच्या कामामुळेच नाहि तर तेथील दिल्या जाणाऱ्या सुविधामुळे कळतो हे येथील काही चमकू कार्यकर्त्यांना समजत नसावे त्यामुळे च मंचरच्या उपजिल्हा रुग्णालयात रुग्णांची होणारी हेडसाळ कुणाला दिसत नसावी किंवा काही राजकीय दाबावापोटी याकडे दुर्लक्ष्र केले जात असावे अशी चर्चा सध्या सुरु आहे. आंबेगाव तालुक्याचा मोठ मोठी बांधकामे पाहून दिसतोय विकास…. मात्र सुविधा आभावी येथील स्थिती झाली आहे बकवास…अशीच काहीशी अवस्था तालुक्यात झाली आहे.
दरम्यान मंचर येथील उपजिल्हा रुग्णालयात आंबेगाव, जुन्नर, खेड, शिरूर, संगमनेर पारनेर तसेच इतर अनेक तालुक्यांतील रुग्ण उपचारासाठी येतात; गेली अनेक वर्षापासुन या ठिकाणी एम डी मेडिसिन डॉक्टर नाही त्यासोबत रुग्णालयात वैद्यकीय कर्मचाऱ्यांची पुरेशी संख्या नसल्याने रूग्णांना व्यवस्थित उपचार मिळत नसल्याचा आरोप आम आदमी पक्षाचे (AAP) पुणे जिल्हा संघटन मंत्री सालिम इनामदार यांनी केला आहे.
आपल्या निवेदनात इनामदार यांनी सांगितले कि रुग्णालयातील वैद्यकीय कर्मचारी रुग्णांशी उद्धट वर्तन करतात, रूग्णांना वेठीस धरले जाते. बऱ्याचदा रुग्णालयाचा वीजपुरवठा खंडित होतो त्यामुळे, रुग्णालयातील अनेक सेवा बंद असतात, या ठिकानी जनरेटर सुविधा नाही त्यामुळे रुग्णांना वारंवार हेलपाटे मारावे लागतात
त्याचप्रमाणे रुग्णालायात येणाऱ्या रुग्णांना जाणीव पूर्वक औषधे नसल्याचे सांगण्यात येते व त्यांना खाजगी रुग्णालायात पाठविले जाते. त्याचप्रमाणे रक्त लघवी सारख्या तपासण्या बाहेरील खाजगी लॅब द्वारे केल्या जातात. यामध्ये रुग्णांना मोठा आर्थिक भुर्दंड सहानुभूती करावा लागत आहे.रुग्णालयात आवश्यक औषधांचाहि मोठा तुटवडा आहे असे सांगितले जाते.या मागे काही आर्थिक व्यवहार संबंधित काही गोलमाल असल्याच्या हि काही चर्चा नागरिकांतून दबक्या सुरु असल्याचे सुरु असल्याचे समजते. तर त्याचसोबत रुग्णालयाच्या परिसरात असणाऱ्या रुग्णवाहिची आर टी ओ मार्फत तपासनी होणे आवश्यक असल्याचे असल्याचे सांगितले जाते त्यामुळे यासार्व बाबींची कसून चौकशी व्हावी अन्यथा येणाऱ्या पंधरा दिवसांनंतर आम आदमीपक्षाच्या वतीने तीव्र आंदोलन छेड ण्यात येईल असा ईशारा इनामदार यांनी दिला आहे.