सामाजिक
विकास दुध उत्पादक संस्थेच्या “चेअरमनपदी विठ्ठल गांजाळे”
मंचर: येथील विकास सहकारी दूध उत्पादक संस्थेच्या चेअरमनपदी विठ्ठल वामन गांजाळे यांची बिनविरोध निवड करण्यात आली असल्याची माहिती भैरवनाथ विकास पॅनेलचे प्रमुख माजी चेअरमन बाबाजी मुळे यांनी दिली.
नुकतीच संस्थेची निवडणूक होऊन भैरवनाथ विकास सहकारी पॅनेलचे सर्व उमेदवार मोठ्या फरकाने विजय मिळवून निवडून आले.तद्नंतर चेअरमन निवडणूकीत विठ्ठल गांजाळे यांचा एकमेव अर्ज आल्याने ते बिनविरोध निवडून आले आहेत.त्यांचा सत्कार माजी चेअरमन बाबाजी मुळे,माजी आदर्श सरपंच दत्ता गांजाळे,कैलास गांजाळे,मंचर तंटामुक्तीगाव समितीचे माजी उपाध्यक्ष गणेश खानदेशे,कांताशेठ बाणखेले आदी मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला.
दरम्यान यावेळीआपले मनोगत व्यक्त करताना नवनिर्वाचित चेअरमन विठ्ठल गांजाळे म्हणाले की,संस्थेची स्थापना कै.विठ्ठलराव बाणखेले आणि कै.पांडुरंग निघोट यांनी चाळीस वर्षांपूर्वी प्रतिकूल परिस्थितीत केली असून संस्थेच्या प्रगतीमध्ये सभासद व दुध उत्पादक शेतकरी यांनी मोठे योगदान दिले आहे.भविष्यात सर्वांना विश्वासात घेऊन संस्थेच्या हिताचे निर्णय घेतले जातील.संस्थेची स्वतः ची जागा, इमारत, पतसंस्था, भागभांडवल, शिल्लक आहे.सभासदांच्या आणि संस्थेच्या दृष्टीने योग्य निर्णय घेतले जातील.
मंचर गावाचे माजी सरपंच बाळासाहेब बाणखेले,ॲड.कुणालआप्पा बाणखेले यांनी नवनिर्वाचित चेअरमन विठ्ठल गांजाळे यांचे अभिनंदन केले आहे. यावेळी संस्थेचे संचालक बन्सी थोरात, श्रीकांत निघोट, राहुल शेटे, अनिल थोरात,सुदाम थोरात,बाबुराव मोरडे, विठ्ठल थोरात, कैलास गांजाळे, श्रीमती लता थोरात, श्रीमती पुष्पलता भांगे आदी उपस्थित होते.