सामाजिक
जांभोरी येथे गुणवंत विद्यार्थी सत्कार व जीवन गौरव पुरस्काराचे वितरण
घोडेगाव दि (प्रतिनिधी )-जांभोरी येथील ग्राम विकास फाउंडेशनच्या वतीने सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या व्यक्तीला जीवन गौरव पुरस्कार व जांभोरी येथील न्यु इंग्लिश स्कूल जांभोरी व जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेतील एकुण २०० विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले.
तालुक्याच्या पश्चिम भागात कार्यरत असलेल्या या संस्थेमार्फत विविध क्षेत्रात कार्य करण्यात येते यावेळी झालेल्या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान लोकनियुक्त सरपंच सौ.सुनंदाताई पारधी भुषाविले तसेच शालेय साहित्याचे औचित्य साधून श्री. अमोल पोपट वाघमारे यांना जांभोरी ग्राम विकास फाउंडेशनच्या वतीने जीवन गौरव पुरस्कार फाऊंडेशनचे वतीने प्रदान करण्यात आला.यावेळी फाउंडेशनचे सर्व संचालक उपस्थित होते.
दरम्यान दहावी मध्ये प्रथम तीन क्रमांक मिळविलेल्या विद्यार्थ्यांना फाऊंडेशनचे आधारस्तंभ श्री.प्रकाश केंगले साहेब यांच्या कडून अनुक्रमे ३०००/-,२०००/-,१०००/- रोख रक्कम व सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले.नियोजित वयोमानानुसार सेवानिवृत्त झालेले जांभोरी ग्राम विकास फाउंडेशनचे कार्याध्यक्ष लिंबाजी केंगले,तानाजी आंबेकर,दिलीप केंगले, रामचंद्र हिले यांचा सन्मानपूर्वक सत्कार करण्यात आला.यावेळी डॉ.अमोल वाघमारे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
यावेळी श्री.बापु सावळेराम किरवे, श्री.सुरेश केंगले, शंकरशेठ शहा,खरेदी विक्री संघाचे संचालक श्री.शामराव बांबळे,प्रा.रूपेश केंगले, नवनाथ केंगले पोलिस पाटील, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पश्चिम विभागाचे युवानेते मारुती दादा केंगले बाळु केंगले,अशोक पेकारी राजु घोडे,मुख्याध्यापक श्री.के.जी.केंगले सर,मा.उपसरपंच विलास केंगले, तंटामुक्ती अध्यक्ष, नामदेव भोकटे, किसन शेळके,किसन पारधी,अंकुश गिरंगे,भिमा केंगले, दुंदा किरवे,दत्ता गिरंगे,सागर काठे प्राथमिक शाळा मुख्याध्यापक मारुती पारधी,सर्व ग्राम पंचायत सदस्य व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्री किरण भवारी यांनी केले व आभार प्रदर्शन श्री.शिवराम केंगले यांनी मानले.