सामाजिक
समाज्याची पीडा दूर करताना “हलाहल” विषासमान त्रास सहज सोसणारा…… “नीलकंठ”
मंचर दि. (प्रतिनिधी ) “निलकंठ” हे नाव भगवान शिवशंकर यांना देण्यात आले. समुद्र मंथनामध्ये जेव्हा हलाहल विषाची उत्पत्ती झाली ते जहरी विष भगवान शंकरांनी पिल्यानंतर त्यांचा कंठ निळा झाला व त्यांना नीलकंठ नावाने संबोधले जाऊ लागले निलकंठ म्हणजेच दुसऱ्याच्या आनंदासाठी स्वतः मोठ्या आंनदाने त्रास सहान करणारा होय…
आंबेगाव तालुक्यातील “निलकंठ काळे” यांच्या विषयी अशीच काहीशी स्थिती त्यांचे संबंधित मित्र मंडळी सांगातात. अनेकांना स्वयंम रोजगार मिळवून देण्यासाठी निलकंठ काळे सदैव तत्पर असतात त्याचपमाणे सर्वसामान्य व्यक्तीच्या मदतीला धावणारा म्हणून त्यांची ख्याती सर्वश्रुत आहे.
समाज्यात अनेक व्यक्ती स्वतःचा आनंद शोधण्यासाठी प्रचंड प्रयत्न करतात. परंतू त्यांना समाधान हे खूपच दुरास्पर असतें परंतू काही जे स्वतःच्या आनंदापेक्षा दुसऱ्याला समाधान व आनंद देण्यात व्यथित करतात त्यांना अनेक याताना सहनही कराव्या लागतात परंतू त्यातून मिळणारे समाधान हे असामान्यच असते. असाच आंबेगाव तालुक्यातील सर्वसामान्य गरज वंतांना शक्य ती मदत करून सहाय्य करणारा युवक ज्याने अनेकांच्या मनात आपली उजळ प्रतिमा निर्माण करीत जिद्दीने स्वतःचा व्यवसाय सुरु केला व इतरांना हि प्रत्येकाच्या इच्छेप्रमाणे व्यवसाय सुरु करून देत अनेक तरुणांना रोजगार मिळवून देत अनेक कुटुंब सक्षम करण्यासाठी अखंड प्रयत्न केले. आज अनेक तरुण स्वतःचा व्यवसाय करीत सक्षम उभे आहेत.
जीवनात ध्येय साध्य करण्याची जबरदस्त इच्छाशक्ती व्यक्तीच्या मनात असेल तर तो कोणतेही असाध्य कार्य सहज पूर्ण करू शकतो याचे उत्तम उदाहरणं म्हणजे निलकंठ काळे होत. घोडेगाव येथे एका सुसंस्कृत कुटुंबातील नीलकंठ यांचा सुरुवातीचा काल हा तसा संघर्षमयच होता. परंतू सर्वांचा विश्वास संपादन करीत व सर्वांना एकत्र घेऊन एकत्र घेऊन काम करण्याची वृत्ती तसेच स्वतःच्या अगोदर इतरांच्या मदतीला जाण्याची वृत्ती हेच त्यांचे खरेखुरे बळ होय. करोना काळात अनेक गरजवंत गोरगरीब कुटुंबाना विविध मदतीच्या माध्यमातून मदतीचास हात निलकंठ यांनी अनेकांना दिला म्हणूनच आज आंबेगाव तालुक्यात सर्व सामान्य मित्र परिवारासह अनेक गोरगरीब जाणाच्या मनात सक्षम व अढळ स्थान निलकंठ काळे यांनी निर्माण केले आहे. समाज्यातील विविध घटकांना मदत करताना तालुक्यातील कला, क्रीडा, शौक्षणिक, क्षेत्रासोबत राजकीय क्षेत्रातील मान्यवरांच्या मनातील शुक्रतारा म्हणजेच निलकंठ काळे होत त्यांना त्यांच्या वाढदिवसाच्या मंगलमय हार्दिक शुभेच्छा……