सामाजिक

दोन्ही किडन्या निकामी झालेल्या मुलाला, “आईने किडनी देऊन दिले जीवनदान”……

Published

on

 मंचर दि. (प्रतिनिधी)”आई” हा शब्द प्रत्येकाच्या मुखात असतो. आपणांवर एखादे छोटे अथवा किमान खरचटलं तरी आपण आई म्हणतो म्हणतात परमेश्वराने आईच प्रेम मिळविण्यासाठी पृथ्वी तलावर जन्म घेतला तुला मातेने नऊ महिने आपल्या उदरात वाढवून आपणाला जन्म देण्यासाठी ती स्वतःच्या जीवाची कधीच पर्वा करत नाही ती आई… आज अशाच एका आईने आपल्या मुलाच्या जीवसाठी आपली किडनी काढून दिली आईच्या पायाखाली स्वर्ग असतो कारण तीच खरी त्यागाची देवता होय,

आईने केलेल्या किडनीदानाचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे. कठोर झालेल्या नियतीमुळे चोहोबाजूंनी घेरलेल्या मुलासाठी मातेने स्वतःची एक किडनी देऊन मृत्यूच्या दाढेतुन आपल्या मुलाला सहीसलामत बाहेर काढले आहे. आपले सर्वस्व त्यागून आपल्या मुलांच्या कल्याणसाठी ती सर्व तो परी त्याग करते ती देवता म्हणजेच…….. “आई”

           वय वर्षे अवघे ३० हा काळ म्हणजे नव्या स्वप्नांना जिद्दीचे पंख लावून आयुष्याला आकार देण्याचे हे वय…… पण, नियतीला कदाचित त्याची आणखी परीक्षा पहाण्याची लहर असावी. काही कळायच्या आतच त्याच्या दोन्ही किडन्या फेल झाल्याचे निदान झाले. अख्खे कुटुंब हादरले. कोलमडून पडण्याची वेळ आली. मात्र पुन्हा एक माता पुढे आली. कठोर झालेल्या नियतीमुळे वादळात चोहोबाजूंनी घेरलेल्या मुलासाठी या मातेने आपले काळीज मोठे केले आणि स्वतःची एक किडनी देऊन मृत्यूच्या दाढेत अडकलेल्या आपल्या मुलाला सहीसलामत बाहेर ओढून आणले. सुनील बन्सी मेंगडे असे या भाग्यवान तरुणाचे नाव आहे. 

“मातेने किडनी देऊन आई म्हणजे काय? याचा बोध करून दिला परंतू या मुलाला सामाजिक स्तरावर माणुसकीची जाणीव असलेल्या अनेक ज्ञात अज्ञात व्यक्तींनी मदत केली त्यांचेही आभार मनाने गरजेचे आहे”

दरम्यान मातृत्वाच्या दातृत्वावर पुन्हा एकदा शिक्कामोर्तब करणारी ही घटना आहे मेंगडेवाडी (ता. आंबेगाव ) गावातील शेतकरी कुटुंबातील बन्सी मेंगडे व उषा मेंगडे दाम्पत्याला दोन मुलगे व एक मुलगी असे पंचकोनी कुटुंब शेतात काबाड कष्ट करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करत आहे. मुलगी मंगल प्रदीप टाव्हरे हिचे लग्न होऊन सासरी गेली आहे. घरी दोन मुलगे पती पत्नी असे आनंदी कुटुंब बन्सी मेंगडे यांच्या सुनील व राहुल या दोन मुलांपैकी सुनील याचे २०१९ साली लग्न झाले त्यांना अडीच वर्षाची लहान मुलगी आहे. सुनील मेंगडे याला २०२० साली टाइफाइड झाला औषधोपचाराने तो बरा झाला पुन्हा २०२१ साली टाइफाइड झाला त्यातुनहि तो बरा झाला.परंतू २०२३ साली या कुटुंबात एक दुखद घटना घडली राहुल मेंगडे याचे अकाली निधन झाले सर्व जबाबदारी सुनीलच्या खांद्यावर आली. सुनील शिरूर तालुक्यातील जातेगाव येथील कंपनीत दररोज मोटारसायकलवर कामाला जात आहे या घटनेतून सावरत असतानाच सुनील मेंगडे याला तब्बेत साथ देईनाशी झाली. शरीराच्या विविध तपासण्या केल्या त्यामध्ये किडनी कमी क्षमतेने काम करत असल्याचे निदर्शनास आले.

त्याचप्रमाणे त्यावर दर महिन्याला हजारो रुपयांची औषधे सुनील घेत आहे. मोटारसायकलच्या प्रवासाने सुनीलला जास्त दगदग होत असल्याने सुनील ला जाण्या येण्यासाठी डिसेंबर २०२४ मध्ये नवीन चारचाकी कार घेण्यासाठी नातेवाईकांनी सहकार्य केले. नवीन कार चे घरी आगमन झाले सर्व आनंदात असताना त्याच दिवशी सुनीलची तब्बेत अचानक बिघडली दुसऱ्या दिवशी डॉक्टरांच्या कडे गेले असता विविध तपासण्या केल्यानंतर दोन्ही किडन्या फेल झाल्या असून आता दररोज डायलेसीस करण्याशिवाय पर्याय नसुन तरूण असल्याने किडनी प्रत्यारोपण करावे लागेल असे सांगितले. मेंगडे कुटुंबावर दुखाचा डोंगर कोसळला किडनी देण्यासाठी पत्नी सोनल तसेच बहीण मंगल पुढे आल्या आमची एक किडनी घ्या दोन्ही किडन्या फेल झाल्याने मृत्यूच्या दारात पोचलेल्या सुनीलला त्याची आई उषा यांनी आपली एक किडनी देण्याचा निर्णय घेतला सर्व तपासण्या केल्यानंतर आईची किडनी सुनीलच्या शरीराला मॅच होत असल्याने किडनी प्रत्यारोपण शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय घेतला. 

दरम्यान त्यासाठी पुण्यातील अनेक हॉस्पिटल मध्ये शस्त्रक्रियेसाठी खर्चाचा अंदाज काढण्यात आला त्यासाठी सुमारे ८ ते १० लाख रुपये सांगण्यात आले त्यासाठी एवढे पैसे कसे जमवणार शस्त्रक्रियेनंतर दर महिन्याला औषधावर खर्चहि जास्त येणार होता त्यामुळे बन्सी मेंगडे यांनी शेताचा एक तुकडा विकून काही पैसे जमवले तरीही पैसे अपुरे पडत होते मुलाच्या उपचारासाठी बन्सी मेंगडे यांची सुरु असलेली घालमेल माजी सरपंच भरत फल्ले यांच्या लक्षात आली त्यांनी बन्सी मेंगडे यांना माजी गृह मंत्री दिलीप वळसे पाटील यांचे स्वीय सहाय्यक रामदास वळसे पाटील यांच्याकडे नेले त्यांनी दिलीप वळसे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पुण्यातील एका खासगी रुग्णालयात साडेपाच लाख रुपयात शत्रक्रिया करण्यासाठी मदत केली राज्य शासनाच्या वतीने दोन लाख रुपयांची मदत हि मिळवून दिली.

 त्याचप्रमाणे सुनील काम करत असलेल्या कंपनीतील मित्रांनी हि एक लाख रुपयांची मदत केली. आई उषा मेंगडे व मुलगा सुनील मेंगडे यांच्या वरील शस्त्रक्रिया यशस्वी झाल्या आज दोघेही मायलेक ठणठणीत बरे झाले असून सुनील हि दररोज कंपनीत कामाला जात आहे तर आई घरातील व  शेतातील दररोजची कामे करत आहे. रामदास वळसे पाटील यांच्यामुळे आमच्या मुलाचे लवकर ऑपरेशन झाल्याने तो मृत्यूच्या दाढेतून परत आला खऱ्या अर्थाने त्यांच्या रूपाने आमच्या मदतीला जणू देवच आल्याची भावना बन्सी मेंगडे यांनी व्यक्त केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Trending

Exit mobile version