सामाजिक
समाजाच्या उन्नतीसाठी, आपल्या मुलांना कर्तृत्ववान व सक्षम होण्याचे धडे देणाऱ्या “रजनीबेन शाह” या सामर्थ्यवान”माता’
मंचर दि. (प्रतिनिधी )- छत्रपती शिवाजी महाराज यांना घडविणाऱ्या “माँ जिजाऊ” एक सक्षम,धुरंधर, सामर्थ्यवान माता होती. महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण हिंदुस्थानात सुरु असलेली मुघल साम्राज्याची जुलमी राजवट उलथुन टाकण्यासाठी छत्रपती शिवारा्यांच्या रूपाने एक कर्तृत्ववान राजा घडविणारी सामर्थ्यवान माता म्हणून जिजाऊ माँ साहेब यांचे नाव आजही आदरांने घेतले जाते
रामायण महाभारताचे पाठ शिकवित छत्रपती शिवाजी महाराजानां घडविणाऱ्या “माँसाहेब जिजाऊ” यांचे चरित्र पाहिले तर त्या फक्त एका मुलाला जन्म देणाऱ्या आई नसून समाज्याच्या उन्नतीचे स्वप्न उरी बाळगत सर्वसामान्य जनतेच्या हिताचे स्वराज्य निर्माण करण्यासाठी एका कर्तृत्ववान राजाला जन्म देणारी व घडविणारी महान माता होती.
“आई” म्हणजे आत्मा व ईश्वर यांचा संगम म्हटले जाते.”आई” म्हणजे ममता, वत्सल्या चा समुद्र…..प्रत्येक जन्म घेणाऱ्या मुलांचा पहिला गुरु म्हणजेच आई… प्रत्येकाची निर्माता म्हणजे आई…. आपल्या मुलाच्या मनात, जीवनात यशस्वी होण्याचे बळ निर्माण करून देणारी माता म्हणजे आई…. म्हणूनच आईला अनन्य साधारण महत्व आहे. मंचर सारख्या लहानशा गावांत राहून समाज्यातील रूढीपरंपरांचा सन्मान राखत संसाराच्या गाड्यात पतीसोबत सर्व परिस्थितीवर सक्षमपणे मात करणाऱ्या एक माता म्हणजेच रजनीबेग शाह. या मातेने आपल्या मुलांना समाज्यात वावरण्याचे धडे देले व यातून आपल्या व समाज्याच्या उत्कर्षांसाठी झगडण्याचे सामर्थ्य निर्माण करण्याची शिकवण हि या मातेने दिली. तसेच समाज्याचे हिताचे दृष्टीने भरभक्कम कार्य उभे करण्यासाठी संस्कारक्षम नव निर्माणचे तसेच नेतृत्वगुण विकासाचे धडे दिले.म्हणूनच “रजनीबेन शाह ” या मातेच्या कर्तृत्ववान दोन मुलांनी बिकट परिस्थितीतून अनेक समस्यावर शांतपणे विचारपूर्वक तोडगा काढत प्रामाणिकपणे कार्य करीत कोट्यावधी रुपयांचा उद्योग उभा केला.
आज देशात नव्हे तर जगाच्या बाजार पेठेत गोवर्धन, गो चीझ एक सक्षम उद्योग म्हणून मान्यता पावला आहे. एका छोट्याश्या डेअरी व्यवसायातून हजारो कोटींची उलाढाल करणारा उद्योग समूह निर्माण करीत समाज्यातील हजारो कुटुंबाना रोजगार तसेच विविध संस्थांच्या माध्यमातून समाज्यातील दुर्बल घटकांना मदतीचा हात देणारे प्रसिद्ध उद्योगपती देवेंद्र शाह व राम समान आपल्या भावाला प्रत्येक कार्यात साथ देणारे लक्ष्मण स्वरूप, प्रीतम शाह यांना घडविनाऱ्या आई “रजनीबेन” या खरोखरच कर्तृत्ववान माता होत्या त्यांच्या निधनामुळे निर्माण झालेली पोकळी कधीही भरून निघणे शक्य नाही. या कर्तृत्ववान मातेला “आंबेगाव तालुका मराठी पत्रकार संघाचे” वतीने भावपूर्ण श्रद्धांजली..