सामाजिक

लाखणगावमध्ये शेतकऱ्याकडून “धरतीमातेचा विधिवत सन्मान करत” तसेच केक कापून ऊसाची लागवड सुरु…

Published

on

शिंगवे पारगाव दि (विजय कानसकर) आंबेगाव तालुक्यातील पूर्व पट्ट्यात असलेल्या लाखणगाव येथील शेतकरी प्रफुल्ल दादाभाऊ विरकर यांनी केक कापून व नारळ फोडून आनंदोस्तोव  साजरा करीत( 86032 व्हरायटी ) ऊस लागवडीस सुरुवात केली 

कोणत्याही व्यवसायाची सुरुवात आनंदोत्सोव साजरा करून केली जाते. सर्वांचा पोशिंदा असलेल्या बळीराजसाठी आपल्या आईसामान जमिनीवर लागवड करत असलेल्या पिकाची पेरणी म्हणजे जणू आनंदोत्सोवच त्यामुळे आंबेगाव तालुक्यातील शेतकरी कुटुंबाने आपया कुटुंबातील सदस्यांसह मित्र व आप्तेस्टाच्या उपस्थितीत केक कापून विधिवत पद्धतीने धरणीमातेचा सन्मान करीत पिकाची लागवड केली.

यावर्षी सर्वत्र चांगला पाऊस झाल्याने विहिरी तलाव  बहुतांश सिंचन प्रकल्प, विहीर, बोअरवेल मोठ्या प्रमाणात भरल्याने आंबेगाव तालुक्यातील अनेक गावांत उसाच्या क्षेत्रात मोठी वाढ होत असल्याचे दिसत आहे. सध्या शेतशिवारात ऊस लागवडीच्या कामाला मोठ्या प्रमाणावर वेग आला आहे. अनेक शेतकरी सहकुटुंब आपल्या शेत जमिनीमध्ये  उसाची लागवड करताना दिसत आहेत. 

यावेळी झालेल्या पावसाने डिंबे धरणात मुबलक पाणीसाठा झाला असून यावर्षी धरण लवकरच भरले आहे त्यामुळे धारणातून पाणी नदीपात्रात सुरु आहे. शिवाय विंधन विहीर व विहिरीच्या पाणी पातळीतील मोठी वाढ झाली आहे. सध्या सिंचन सुविधा पुरेपूर उपलब्ध असल्याने शेतकरी ऊस लावणीच्या कामाला प्राधान्य देत असल्याचे चित्र आहे. उसाच्या नवनवीन प्रजातीची माहिती घेत उशिरा पक्व होणार्‍या व अधिक उत्पादन देणार्‍या उसाची लागवड करण्याकडे शेतकर्‍यांचा कल असल्याचे दिसून येत आहे 

  दरम्यान यावेळी वातावरणातील बदलत्या स्थितीमुळे भाजीपाला पिकावर होणारा विविध रोगांचा प्रादुर्भाव, गारपीट, अवकाळी पाऊस यासह विविध नैसर्गिक आपत्तींमुळे अन्य पिकांऐवजी ऊस पीक शेतकर्‍यांसाठी सुरक्षित अन् आश्वासक ठरत आहे. एकदा लागवड केली की हमखास उत्पादन निघण्याची हमी असल्यामुळे सिंचन सुविधा उपलब्ध असणारे शेतकरी उसाला पहिली पसंती देताना दिसत आहे. त्यामुळे सध्या तालुक्यात मोठ्या प्रमाणावर उसाच्या क्षेत्रात वाढ होताना दिसत आहे. ऊस हमखास उत्पादन देणारे पीक म्हणून बघितले जात असले तरी  मजुरांची उपलब्ध ता कमी असल्यामुळे असल्याने ऊस लागावादीचा भावही वाढलेला दिसत असल्याने  शेतकरी हैराण झाले आहेत. अपुऱ्या मजुरां आभावी बळीराजाला घरातील महिलांसह लहान मुलांनाही ऊस लागवडीच्या कामाला न्यावे लागत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Trending

Exit mobile version