सामाजिक
“राजकीय व्यास पिठावरून सतत आरोप करणाऱ्या राजकीय नेत्यांनी, “मैत्रि दिनाचे औचित्य साधत एकमेकांना दिल्या शुभेच्छा”…!!!
मंचर दि (सदानंद शेवाळे)- राजकारणात कोणी कोणी कोणाचा मित्र ही नसतो तर कोणी कोणाचा शत्रूही नसतो दिवसा ढवळ्या एकमेकांवर आगपाखाड करणारे राजकारणी मात्र स्वतः चे हितसंबंध सांभाळत राजकारण करतात यात संपतो मात्र कार्यकर्ता…… कारण कार्यकर्ता म्हणजे एक राजकारणाच्या पटालावरील प्यादं या पेक्षा त्याची दुसरी तिसरी कोणतीही ओळख नाही. नेत्याच्या आदेशावर आपले जीवन पणाला लावणारं दिशाहीन प्याद….. काही कारणासाठी म्हणजेच ध्येय प्राप्तीसाठी राजकारण करतात ते नेते तर जे दिशाहीन पणे अकारण राजकारण करतात ती मात्र प्यादी होत असे म्हणणे काही गैर ठरणार नाही.
दरम्यान राजकारणातील नेत्यांचे सर्वच मित्र असतात शत्रू फक्त व्यासपीठावरच असे म्हणणे चुकीचे नाही कारण महाराष्ट्राच्या नव्हे तर देशाच्या राजकारणात अशी अनेक उदाहरणे आहेत कि, दिवसभर राजकीय व्यासपिठावरून एकमेकांवर आरोप प्रत्यांरोप करणारे राजकारणी रात्री एकाच मैफिलीत बसून हितगुज साधल्याच्या अनेक घटना सांगितल्या जातात.
दरम्यान आज मैत्री दिनाचे औचित्य साधत आंबेगाव तालुक्यात विविध पक्षाच्या राजकीय नेत्यांनी एकमेकांना मैत्री दिनाच्या शुभेच्छा देत कार्यकर्त्यापुढे नवा धडा ठेवला आहे कि, राजकीय विरोध हा फक्त व्यास पिठावरच असतो याचे उत्तम उदाहरण तालुक्यातील जनतेला समोर मांडले आहे. .
घोडेगाव ता आंबेगाव या ठिकाणी शिवसेना शिंदे गटाचे नवनिर्वाचित जिल्हाप्रमुख देविदास दरेकर यांच्या सोबत शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे नवनिर्वाचित तालुकाप्रमुख नितीन भालेराव, सोबत भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष विजय पवार, उद्धव ठाकरे पक्षाच्या महिला आघाडी च्या नेत्या सौ कलावतीताई पोटकुले ताई तसेच शिवसेना शिंदे गटाचे उपजिल्हा प्रमुख व नवी मुंबई महानगर पालिकेचे माजी विरोधी पक्षनेते दिलीप घोडेकर एकत्रित उपस्थित राहून एकमेकां सोबत गप्पा मारत नवीन पक्षीय जबाबदारीसाठी शुभेच्छा दिल्या.