सामाजिक
“स्वतःच्या सख्ख्या भावाने जरी कर्ज घेतले तरी, त्याला कर्ज माफ केले जाणार नाही”- देवेंद्र शाह
मंचर दि (प्रतिनिधी)- स्वतःच्या सख्ख्या भावाने जरी कर्ज घेतले तरी,त्याला कर्ज माफ केले जाणार नाही त्यामुळे इतर कोणत्याही कर्जदाराला कोणतीही सवलत दिली जाईल या विषयी शंका मनात आणू नये. असा इशारा शरद सहकारी बँकेचे अध्यक्ष देवेंद्र शाह यांनी दिला.
पुणे जिल्ह्यात अग्र गण्य असलेल्या मंचर येथील शरद सहकारी बँकेची ५२वी वार्षिक सर्वासाधारण सभा आज मंचर येथील कवयत्री शांता शेळके सभागृहात पार पडली यावेळी आपले मनोगत व्यक्त करताना प्रसिद्ध उद्योगपती व शरद बँकेचे अध्यक्ष देवेंद्र शाह यांनी कर्जदारांना तंबीच दिल्याचे दिसून आले त्यांनी मी माझ्या सख्या भावाचे कर्ज माफ होऊ देणार नाही असे सांगत पुढील काळात बँकेकडून कर्ज वसुलीचे निर्बंध अधिक कडक होणार असल्याचे सुचोवात दिले
त्याचप्रमाणे पुढे बोलताना शाह म्हणाले कि, सद्य परिस्थितीत बँकिंग क्षेत्रात डिजीटल तंत्रज्ञानाचा वापर व सायबर सुरक्षितता या बाबी फार महत्त्वाची भूमिका बजावत आहे. आपली बँक प्रामुख्याने ग्रामीण भागात व्यवसाय करित असल्यामुळे बदलत्या काळानुसार ग्राहकांना डिजीटल सेवा देण्याचा पूर्ण प्रयत्न करत आहे. तंत्रज्ञानाचा उपयोग करून जलद आणि उत्तम सेवा देण्याचा प्रयत्न बँक नेहमीच करित आहे. त्यामुळे बँकिंग क्षेत्रातील तंत्रज्ञान विकासाच्या प्रत्येक टप्प्यावर आवश्यक व अद्यावत तंत्रज्ञान बँकेने आत्मसात केले आहे. बँकेच्या २७ शाखा व मुख्य कार्यालयात अद्यावत सीबीएस प्रणाली कार्यरत केलेली आहे. ग्राहकांना बँक डिजीटल सेवा देत असुन एक मिनिटात दहा टक्के लाभांश सभासदांच्या खात्यावर जमा करण्यात आला असल्याचे त्यांनी सांगितले
दरम्यान यावेळी आपले मत व्यक्त करताना राज्याचे माजी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील म्हणाले कि, आदरणीय शरद पवार” यांचे नाव आपण या संस्थेला दिले आहे. त्यामुळे त्यांच्या नावाला गालबोट लागेल असे कोणतेही कृत्य या संस्थेमध्ये होणार नाही हि आपल्या सर्व सभासदांची जबाबदारी आहे. त्यामुळे मोठे कर्ज देणे कमी करा कारण बँकेची थकीत कर्ज या मोठ्या लोकांकडे जास्त प्रमाणात असते त्यामुळे बँक अडचणीत येऊ शकते.
यावेळी बँकेचे उपाध्यक्ष विवेक वळसे पाटील,भीमाशंकर सह साखर कारखाण्याचे चेअरमन बाळासाहेब बेंडे, व्हाईस चेअरमन प्रदिप वळसे पाटील, राष्ट्रवादी काँग्रेस तालुका अध्यक्ष विष्णु हिंगे, किरण वळसे पाटील, मानसिंग पाचुंदकर, दत्तात्रय थोरात, अजय घुले,नीलेश थोरात,वैभव उंडे, दादाभाऊ पोखरक आदी मान्यवर बँकेचे सभासद व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.