सामाजिक
भीमाशंकरचा रु. २१०/- हप्त्यासह अंतिम ऊस दर रु. ३२९०/- प्रती मे. टन जाहीर : शेतकऱ्यांकडून समाधान व्यक्त
शिंगावें पारगाव दि (प्रतिनिधी)- भीमाशंकर सह साखर कारखाण्याने गाळप केलेल्या उसाचा अंतिम हप्ता रुपये २१०/- देऊन उसाचा अंतिम दर .३,२९०/- रुपये प्रती टन जाहीर केला असल्याची माहिती कारखान्याचे चेअरमन बाळासाहेब बेंडे यांनी दिली
भीमाशंकर सह साखर कारखान्याचे संस्थापक-संचालक व महाराष्ट्र राज्याचे माजी सहकारमंत्री दिलीपराव वळसे पाटील यांचे मार्गदर्शनाखाली मा. संचालक मंडळाच्या झालेल्या बैठकीत घेतलेल्या निर्णयानुसार मागील सन २०२४-२५ गाळप हंगामात गाळप केलेल्या ऊसासाठी अंतिम हप्ता जाहीर करण्यात आला असून गाळप हंगामात कार्यक्षेत्र व परिसरातील गाळप केलेल्या संपूर्ण ११ लाख ३८ हजार ४९६ मे. टन ऊसासाठी कारखान्याने यापूर्वी एफ.आर.पी. नुसार रु. ३,०८०/- प्रती मे. टनाप्रमाणे रक्कम रु. ३५० कोटी ६६ लाख ऊस उत्पादक शेतक-यांना अदा केलेली आहे. अंतिम हप्ता रु. २१०/- प्रती मे.टन निश्चित केला असून शिक्षण संस्था निधी रु. १०/- प्रती मे.टन व भाग विकास निधी रु. २५/- प्रती मे.टन याप्रमाणे एकूण रु. ३५/- प्रती मे.टन वजा जाता रु. १७५/- प्रती मे.टन अंतिम हप्ताची रक्कम रु. १९ कोटी ९२ लाख ऊस उत्पादक शेतक-यांचे बँक खात्यावर दिवाळी सणापूर्वी वर्ग करण्यात येणार आहे.
दरम्यान शेतकरी वर्गातून देण्यात आलेल्या या हप्त्याबद्दल समाधान व्यक्त केले जात असून पुढील काळात कारखाण्याने चढत्या क्रमाणे समाधानकारक भाव उसाला द्यावा अशी प्रतिक्रिया ही अनेक शेतकऱ्यांनी व्यक्त केली
याविषयीं बोलताना चेअरमन बाळासाहेब बेंडे म्हणाले कि,भीमाशंकर कारखान्याने नेहमीच ऊस उत्पादक शेतक-यांना जास्तीचा दर दिलेला असून यापुढेही हि परंपरा कायम राहील. तरी गाळप हंगाम २०२५-२६ करीता कार्यक्षेत्र व परिसरातील सर्व ऊस उत्पादक शेतक-यांनी भीमाशंकर कारखान्यास आपला ऊस देवून पुर्वीप्रमाणेच सहकार्याची भावना ठेवावी अशी विनंती ही चेअरमन बेंडे यांनी केली.