सामाजिक
अडिवरे येथे “आदिवासी स्त्रीयांसाठी मोफत आरोग्य शिबीर संपन्न”.
डिंभे दि (प्रतिनिधी)- आदिवासी स्त्रियांचे आरोग्य सुधारण्यासाठी आडीवरे ता. आंबेगाव येथे स्त्रियांसाठी आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते यांस महिलाकडून उत्कृष्ठ प्रतिसाद मिळाल्याची माहिती सामाजिक कार्यकर्ते अमोल अंकुश यांनी दिली.
आंबेगाव तालुक्याच्या आदिवासी पश्चिम पाट्यातील डिंभे धरणाच्या आतील बाजूस दुर्गम भागात असलेल्या आडीवरे येथील प्राथमिक आरोग्य केंद्रावर अडिवरे स्त्री रोग निदान आणि उपचार शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.या शिबिरात विशेषतः पावसाळ्यात आदिवासी भागा मध्ये शेतात काम करणाऱ्या महिला वर्गा मध्ये मोठ्या प्रमाणात होणाऱ्या त्वचेचे आजार व साथी चे आजार पायांना कुहे होने,सर्दी,ताप,डोके दुखी, सांधे दुखी, हिमोग्लोबिन कमी होने ई. आजारा च्या तपासण्या सदर करून महिलांना मोफत औषधोपचार करण्यात आले. यात सुमारे ९३ महिलांच्या विविध तपासण्या करण्यात आल्या.
दरम्यान या शिबिराचे उद्घाटन आदिवासी सेवक मा.शंकरराव मुदगुन यांच्या हस्ते करण्यात आले. या शिबिराचे आयोजन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे युवा नेते मा.अमोल अंकुश मार्गदर्शनाखाली करण्यात आले या शिबिरास मा.चंद्रकांत बांबळे सेवा निवृत्त कर्मचारी संघटना अध्यक्ष, मा.सखाराम गभाले (बाजार समिती संचालक) मा.संगिता किर्वे ( सरपंच), मा.रामदास भोकटे, जावजी कोकणे ई मान्यवर उपस्थित होते.
शिबिरामध्ये प्राथमिक आरोग्य केंद्र अडिवरे येथील वैद्यकीय अधिकारी डॉक्टर दशरथ चौरे आणि डॉक्टर प्रथमेश भोर यांनी महिलांच्या विविध आजाराविषयी माहिती देऊन त्यांच्या आरोग्य समस्या विषयी मार्गदर्शन केले या शिबिरासाठी प्राथमिक आरोग्य केंद्र अडिवरे येथील आरोग्य निरीक्षक श्री गोविंद भारमळ.आरोग्य निरीक्षक ( हिवताप विभाग ) श्री अजय बोराडे. आरोग्य सहायिका श्रीमती विजया शिंदे. आरोग्य सेवक श्री दत्ता कंठाळे रामचंद्र असवले आरोग्य सेविका श्रीमती पोटे मॅडम, उघडे मॅडम, गिरे मॅडम सर्व आशा स्वयंसेविका गटप्रवर्तक श्रीमती वंदना तळपे, स्वाती कोकणे यांचे सहकार्य मिळाले. शिबिरासाठी महा लॅब मंचर यांच्यावतीने प्रयोगशाळा तंत्रज्ञ म्हणून अविनाश पारधी यांनी काम पाहिले