सामाजिक
भीमाशंकर परिसरात सुरु असलेल्या संततधार पावसाने डिंभे धरणातून पाण्याचा विसर्ग सुरु घोड नदीकाठच्या गावांना सावधनतेचा इशारा….
मंचर दि. (सदानंद शेवाळे)- गेल्या दोन दिवसापासुन डिंभे धरण परीक्षेत्रात सुरु असलेल्या पावासामुळे धरणातील पाण्याची पातली वाढल्यामुळे घोड नदीपात्रात पाण्याचा विसर्ग सुरु करण्यात आला असून नदिकाठच्या नागरिकांनी सतर्क राहावे असे आवाहन कुकडी प्रकल्प अभियंता यांनी केले आहे
दरम्यान डिंभे धरण पाणलोट क्षेत्रात संततधार पाऊस सुरु असल्यामुळे डिंभे धरण क्षेत्रातील ओढ्या नाल्यांना मोठ्याप्रमाणा वर पाणी आले असल्यामुळे डिंभे धरणातील पाण्याची पातळी झपाट्याने वाढत चालली आहे सध्या धरणामध्ये ९४% पाणी असून खबरदारीच्छा उपाय म्हणून धरणातून आज दि १९/८/२०२५ रोजी दुपारी २ वाजताच्या सुमारास ३००० क्यूसेस ने पाण्याचा विसर्ग घोड नदी पात्रात करण्यात आला आहे. धरणातील पाणी पातळी झपाट्याने वाढत असून सध्या धरणातून तीन हजार क्यूसेस पाणी नदीपात्रात सोडण्यात आले आहे.
.दरम्यान पावसाचा वाढता जोर पहाता घोड नदीपात्रात डिंभे धरणातून विसर्ग वाढवण्याची देखील शक्यता आहे.त्यामुळे, नदीकाठच्या गावांतील सतर्क राहावे.तसेच नदीपात्रात किंवा नदीकाठी कोणीही जाऊ नये व आपल्या जनावरांना जाऊ देऊ नये.त्याचप्रमाणे आपल्या गावातील लोकांना ही माहिती कळावी म्हणून सतर्कतेचा इशारा पूर नियंत्रण कक्ष कार्यकारी अभियंता कुकडी पाटबंधारे विभाग नारायणगाव यांचे वतीने देण्यात आला आहे.