सामाजिक
राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धेत घोडेगाव येथील “न्यू इंग्लिश मीडियम स्कूलच्या” विद्यार्थ्यांनी मिळविले घवघवीत यश
घोडेगाव. (प्रतिनिधी) जुन्नर नगर वाचनालय व स्वराज्य मित्र मंडळ, यांचे संयुक्त विद्यमाने . झालेल्या राज्यस्तरीय भव्य मराठी वक्तृत्व स्पर्धेत घोडेगाव ता. आंबेगाव येथील विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय यश मिळविले
दरम्यान जुन्नर (ता जुन्नर )येथे स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधत पार पडलेल्या राज्यस्थारीय मराठी वक्तृत्व स्पर्धेत घोडेगाव येथील आंबेगाव तालुका विद्या विकास मंडळ संचलित, न्यू इंग्लिश मीडियम स्कूल,च्या एकूण २७ विद्यार्थ्यांनी विविध वयोगटातून सहभाग घेतला यामध्ये खालील विद्यार्थ्यांनी स्पर्धेमध्ये उत्कृष्ट सादरीकरण करून यश संपादन केले आहे.बक्षीस पात्र विद्यार्थ्यांची नावे पुढील प्रमाणे: -इ. १ली ते २री गट: -कु. अभिनव तानाजी बोऱ्हाडे (प्रथम क्रमांक) कु. क्रिशा निखिल आर्वीकर (तृतीय क्रमांक) तसेच इ.३री ते ४थी गट:-कुमारी आर्या स्वप्नील वाळुंज (प्रथम क्रमांक),कु. अनुजा हर्षद राऊत(उत्तेजनार्थ),इयत्ता ८वी ते१०वी गट:-कु.ऋतिका रवींद्र जैद (प्रथम क्रमांक),कु.अनुष्का वसंत लांघी (तृतीय क्रमांक),कु. स्नेहल दत्तात्रय डुकरे (उत्तेजनार्थ) या स्पर्धेत सर्वात जास्त एकूण सात बक्षिसे विद्यालयाने विद्यालयाने पटकावली.
दरम्यान सर्व यशस्वी विद्यार्थ्यांना मराठी विषय शिक्षिका सौ .वंदना वायकर सौ. सुषमा फलके ,सौ सुनीता वाजे, सौ प्रज्ञा घोडेकर, सौ. जागृती महाजन यांनी मार्गदर्शन केले.तसेच संस्थेचे अध्यक्ष तुकाराम काळे ,उपाध्यक्ष अंड. संजय आर्वीकर, कार्याध्यक्ष सुरेश शेठ काळे, संस्थेचे सचिव विश्वासराव काळे, जॉईंट सेक्रेटरी प्रशांत काळे, समन्वय समिती चेअरमन राजेश काळे, खजिनदार सोमनाथ काळे, वस्तीगृह कमिटी चेअरमन सूर्यकांत गांधी, विद्यालयाचे चेअरमन बाळासाहेब काळे, संस्थेचे संचालक अजित काळे व अक्षय काळे यांनी सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे व मार्गदर्शक शिक्षकांचे तसेच पालकांचे हार्दिक अभिनंदन केले.
दरम्यान आपले विद्यार्थी शालाबाह्य राज्यस्तरीय स्पर्धांमध्ये अतिशय उत्कृष्ट कामगिरी करून संस्थेच्या नाव लौकिकात भर घालत आहे याचा आम्हाला सार्थ अभिमान वाटतो असे गौरवोद्गार सोमनाथ काळे सर यांनी काढले.