सामाजिक

काळवाडी (जांभोरी)येथे गोठा आगीच्या भक्षस्थानी पडल्याने बैलाचा होरपळून मृत्यू, “आदिवासी शेतकऱ्याचे प्रचंड नुकसान

Published

on

भीमाशंकर   : – काळवाडी (जांभोरी) येथे दरम्यान गोठ्यास अचानक आग लागल्याने गोठा जळुन भस्मसात झाला.तर गोठ्यात असलेल्या तीन बैला पैकी एक बैल होरपळून  गोठ्यातच गतप्राण झाला व दोन जखमी जण जखमी झाले आहेत.

  आंबेगाव तालुक्याच्या आदिवासी पश्चिम भागातील भीमाशंकर खोऱ्यात असलेल्या जांभोरी येथील काळवाडी वस्तीवर दुर्दैवी हि घटना घडली  आदिवासी भागात  बहुतांश गोठे घराला लागुनच असतात परंतू  सदर गोठा राहत्या घरापासून दूर पडाळीवर होता यामुळे मोठी दुर्घटना टळली. भर दुपारी चा वाजताच्या दरम्यान अचानक पणे आग लागून हि घटना घडली. आग लागल्यानंतर जवळ असलेल्या ग्रामस्थांच्या लक्षात येताच त्यांनी आग विझवण्याचा प्रयत्न केला परंतु आगीने रौद्र रूप धरण केल्यामुळे  संपूर्ण  गोठा आगीच्या भक्षस्थानी पडला यात तीन पैकी दोन बैलांना वाचविण्यात यश आले असून एका बैलाचा होरपळून मृत्यू झाला.यात बबन भोरु भोकटे या शेतकऱ्याचे मोठे नुकसान झाले आहे.

    दरम्यान पोलीस कॉन्स्टेबल सावंत , लगड , तलाठी विशाल घारे  , कोतवाल लक्ष्मीबाई मोरमारे, पशुवैद्यकीय आधिकारी विजय कोंढवळे,डाॅक्टर सचीन भोईर, पोलीस पाटील नवनाथ केंगले, जांभोरी गावच्या लोकनियुक्त सरपंच सुनंदाताई पारधी यांचे समवेत प्रशासनाकडून जागेवर जाऊन पंचनामा करण्यात आला आहे. शेतकऱ्यास लवकर मदत मिळावी असी ग्रामस्थांकडून मागणी करण्यात आली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Trending

Exit mobile version