सामाजिक
घोडेगाव येथे “गणेशोत्सव व ईद काळात कायदा व सुव्यवस्थेसाठी” पोलिसांकडून रूट मार्च चे आयोजन
घोडेगाव दि. (प्रतिनिधी):-गणेशोत्सव व ईद ए मिलाद येत असल्याने या काळात कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये,यासाठी घोडेगावयेथील पोलिसांनी संपूर्ण शहरातून रूट मार्च काढला.
सध्या सणासूदीचे दिवस सुरु असून सर्वत्र आनंदाला उधान आले आहे. या काळात मुस्लिम धार्मियांचा पवित्र सण ईद तर हिंदू धर्मातील सर्व गणांची देवता श्री गणेश देवता यांचा गणेशोत्सव हे दोन्ही सण एकत्रित आले आहेत त्यामळे आंबेगाव तालुक्याची शासकीय राजधानी व पश्चिम पाट्यातील महत्वाची बाजारपेठ असलेल्या घोडेगाव शहरातून सणासुदीच्या काळात कायदा व सुव्यवस्था बिघडू नये, यासाठी रूट मार्चसंपूर्ण शहरातून काढण्यात आला.
दरम्यान तालुक्याचे पश्चिम भागात शेकडो सार्वजनिक,तर घरोघरी श्री गणेश स्थापना होते काही घरात दीड दिवस, काही ठिकाणी सात दिवस, ते दहा दिवसांपर्यंत देखील श्रीच्या मूर्तीची प्रतिष्ठापणा केली जाते.त्यामुळे येणाऱ्या सणात कोणीही कायदा व सुव्यवस्था बिघडणार नाही याची काळजी नागरिकांनी घ्यावी. याकरिता घोडेगाव पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक सागर पवार यांच्या आदेशाने घोडेगाव शहरातील मार्गावर रूटमार्च काढण्यात आला होता.
दरम्यान या रूट मार्च मध्ये शस्त्रधारी पोलिस अधिकारी, कर्मचारी सहभागी झाले होते.पोलिस वाहनांचाही यामध्ये समावेश होता.सणासुदीच्या काळात कायदा सुव्यवस्था सुरळीत रहावी. व सर्वसामान्य दृष्टीने नागरिकांमध्ये असणारे भीतीचे वातावरण दूर व्हावे, यासाठी या रूट मार्च चे आयोजन केले जाते.यावेळी प्रत्येक चौकात थांबून ईद ए मिलाद व गणेशोत्सव शांततेत पार पाडण्याचे आवाहन पोलिसांचे वतीने करण्यात आले.