सामाजिक

“समाजसेवेचा आव आणत, परिस्थितीनुसार स्वहितासाठी, रंग बदलणाऱ्या… “नटसम्राट व वगसम्राटांचा” आंबेगावांत झालाय का? सुळसुळाट…

Published

on

मंचर दि (प्रतिनिधी) राजकारण… सद्या जो उठतो तो राजकारण करायला निघतो समाज कारणाच्या “गोंडस” नावाखाली आपली राजकीय पोळी भाजण्याचा व्यवसायच काही कथाकथित जनसेवक करत आहेत. कार्यसम्राट, जनसेवक समाज सेवक आशा स्वतःला स्वतःचं उपाध्या देत जाहिरात बाजी करणाऱ्या या  नटसम्राट व वगसम्राटांची संख्या वाढत असल्याची चर्चा आंबेगावात सुरु आहे. 

“कथाकथित जनसेवक कि वगसम्राट”

पावसाळ्यांत जशा छत्र्या उगवतात त्या कुत्र्यांच्या छत्र्यांप्रमाणे सद्या आंबेगावाच्या राजकारणात अनेक जनसेवक समाज सेवक निर्माण झाले आहेत. वडिलोपार्जित किंवा कुणाकडून मिळालेल्या मालमत्तेवर श्रीमंतीचे सोंग करीत व आम्हीच खरे जनसेवक अथवा समाजसेवक म्हणतं स्वतःची पाठ स्वतः च थोपटून, समाज सेवेचा आव आणत फिरणाऱ्या जनसेवकांचे सद्या आंबेगाव तालुक्यात पेव फुटले असल्याचे दिसत आहे. 

दरम्यान हे कथाकथित जनसेवक, समाजसेवेचा अविर्भाव आणत काही टूकारांना बरोबर घेत जाहिरात बाजी करीत फिरत असल्याचे चित्र सध्या आंबेगाव तालुक्यात पहावायास मिळत आहे. तर आपण च खरे समाजसेवक जनसेवक म्हणवणाऱ्या या कथाकथित स्वयं घोषित पुढऱ्यांना जनतेचे काहीच देणे घेणे नसावे यांना जनतेची सेवा नाही तर समाजसेवेच्या गोंडस नावाखाली राजकारण करून नफेखोरीचा व्यवसाय करणाऱ्यांची संख्या सध्या आंबेगावांत झपाट्याने वाढत असल्याचे दिसत आहे.

दरम्यान सवंग लोकप्रियतेसाठी तालुक्यातील काही सहकारी संस्थांच्या कारभारावर बेछुट आरोप करण्यात यांना धन्यता वाटते अशा कथाकथित जनसेवकांचे तालुक्यातील संस्थांच्या उभारणीत शून्य योगदान असणाना हे स्वयंधोषित जनसेवक (पप्पू पहिलवान) फक्त आरोप करत असल्याचे दिसत आहे. अशा जनसेवाकांचे काही बोलाविते धनी असण्याची शक्यता नकारता येत नाही कारण दुसऱ्याबद्द्ल आकस धरून केसाने गळा कापणाऱ्या पासूनही सावध असावे. त्याचप्रमाणे या तालुक्यात अनेक कायदेतज्ञ, अर्थतज्ञ् वास्तव्यास असताना जेवणासाठी येणारे म्हणत सर्वसामान्य शेतकऱ्यांस हिनविण्याचा प्रयत्न करणाऱ्या या कथाकथित जनसेवकांना “सहकारातून सहकार्य” करण्याची सहकाराची खरी भूमिका यांच्या अंगवळनीच पडलेली नसावी असे दिसते. यासाठी आरोप करणाऱ्या जनसेवकांनी एखादी संस्था उभारून तीला प्रगती पथावर नेऊन काही युवकांना रोजगार उपलब्ध करून दिला तर हे काम एखाद्या कार्यक्रमात जनसेवक असल्याचे पोस्टर लावून उगाचच दुधाच्या बाटल्या वाटण्यापेक्षा श्रेष्ठ ठरेल तसेच गरजवंतांना प्रमाणिक मदत करून जनतेचे शुभआशीर्वाद नक्की मिळतील अशी चर्चा नागरिकांनातून सुरु आहे.

दरम्यान आम्ही खरे दानवीर व समाज सेवक आहोत.असे म्हणणाऱ्यांना हे माहित असायला हवे कि, सनातन धर्मात आपण एखादे दान प्रामानिक पणे करत असू तर त्याची वाच्चता गुप्त ठेवावी म्हणजेच म्हणतात दान इतक्या गुप्तपणे असावे कि, उजव्या हाताने केलेली मदत डाव्या हाताला हि कळू नये परंतु आजकाल या जनसेवकांची, समाजसेवा अथवा मदत हा राजकीय व्यवसायाचा भाग बनला आहे.सवंग लोकप्रियतेसाठी एखाद्या छोट्या रकमेची मदत करायची व त्यावेळी जाहिरात एव्हडी करायची कि लाखोचो खैरात वाटली असा आव आणणारे व मला कोणावर आरोप करायचा नाही असे म्हणत पत्रकार परिषदा घेत बेछुट आरोप करून संस्थाना लक्ष करणाऱ्या व स्वतः च्या स्वार्थासाठी पक्षांतर करणाऱ्या जनसेवकांना खरचचं, समाज सेवक म्हणावे कि, नटसम्राट अथवा वगसम्राट….  अशी चर्चा सर्वत्र सुरु आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Trending

Exit mobile version